जळगाव : नशिराबादजवळ दोन कारची धडक, चार जणांची मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 07:54 IST2018-08-02T03:04:21+5:302018-08-02T07:54:53+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादनजीक बुधवारी मध्यरात्रीनंतर दोन कारची समोरासमोर धडक झाली. त्यात चार जण ठार तर पाच जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जळगाव : नशिराबादजवळ दोन कारची धडक, चार जणांची मृत्यू
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबादनजीक बुधवारी (1 ऑगस्ट) मध्यरात्रीनंतर दोन कारची समोरासमोर धडक झाली. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमधील चार पैकी तीन जण जळगावातील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नशिराबादनजिक वळणावर काझी पेट्रोलपंपाजवळ हा भीषण अपघात झाला. त्यात कार क्रमांक एमएच 19 बीयू 8710 आणि एमएच
19 सीयू 6633 यांची समोरासमोर टक्कर झाल्याची माहिती मिळाली. यात एका कारचा चालक प्रिन्स अग्रवाल (रा. सम्राटनगर) हा जखमी आहे.