जिल्हाधिकारी कार्यालयातून ट्रॅक्टर लांबविणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:14 IST2021-04-05T04:14:56+5:302021-04-05T04:14:56+5:30

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात जप्त केलेले ट्रॅक्टर लांबविणाऱ्या प्रवीण ऊर्फ मनोज रमेश भालेराव (वय २४) व त्याचा ...

Two arrested for removing tractor from collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयातून ट्रॅक्टर लांबविणाऱ्या दोघांना अटक

जिल्हाधिकारी कार्यालयातून ट्रॅक्टर लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात जप्त केलेले ट्रॅक्टर लांबविणाऱ्या प्रवीण ऊर्फ मनोज रमेश भालेराव (वय २४) व त्याचा साथीदार पप्पू ऊर्फ मुकेश रमेश शिरसाठ (वय २२) दोघ रा. पिंप्राळा हुडको बौद्ध वसाहत या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. त्यांच्याकडून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. ‌

यातील प्रवीण हा दोन वर्षांसाठी तडीपार आहे. प्रवीण भालेराव व मुकेश शिरसाठ हे दोघे बी.जे. मार्केट परिसरात ट्रॅक्टर लावून उभे असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिसून आले. त्यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेत त्यांची विचारपूस केली असता त्या दोघांनी हे ट्रॅक्टर गेल्या वर्षभरापूर्वी कलेक्टर ऑफिसमधून चोरी केले असून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचा रंग बदलविला असल्याचे त्यांनी सांगितले. त्या दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two arrested for removing tractor from collector's office