ट्रीपल सीट दुचाकीला ट्रकची धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 10:17 IST2020-06-15T08:50:36+5:302020-06-15T10:17:30+5:30

तिघे एकाच मोटरसायकलने परत यायला निघाले होते तर चंद्रकांत आणि हर्षल दोन्ही वेगवेगळ्या मोटरसायकलने पुढे निघाले होते.

Triple seat two-wheeler hit by a truck, killing both in a horrific accident | ट्रीपल सीट दुचाकीला ट्रकची धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

ट्रीपल सीट दुचाकीला ट्रकची धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

अमळनेर (जळगाव)  : शिर्डीहून मोटरसायकलने परतताना ट्रकने धडक दिल्याने  शहरातील झामी चौक व बालाजीपुरा भागातील तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आज सोमवार रोजी पहाटे 1 वाजता मालेगाव - पुणे रोडवरील जळगाव चोंडी गावाजवळ हा दुर्दैवी अपघात झाला. त्यामध्ये, विकास ईशी आणि गणेश चौधरी या दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.  

शहराच्या झामी चौकातील विकास जगन्नाथ ईशी, वय 29 , बालाजी पुरा भागातील साईबाबा मंदिराजवळील गणेश चौधरी वय 32, प्रीतम गुलाब ठाकूर वय 30 , चंद्रकांत पाटील हे चार जण 14 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारस प्रीतमचा भाऊ हर्षल ठाकूर याला घ्यायला मोटरसायकलने शिर्डी जाण्यास निघाले. हर्षल मोटरसायकलने पुण्याला गेलेला होता, तो मोटरसायकलने शिर्डीपर्यंत आला होता. तर, रात्री शिर्डीहून परतताना विकासला गाडी चालवता येत नव्हती म्हणून प्रीतमने गाडी चालवायला घेतली व गणेश त्याला पाठीमागे धरून बसला. तिघे एकाच मोटरसायकलने परत यायला निघाले होते तर चंद्रकांत आणि हर्षल दोन्ही वेगवेगळ्या मोटरसायकलने पुढे निघाले होते. मालेगाव जवळील जळगाव चोंडी गावाजवळ एका ट्रकने धडक दिल्याने एकाच मोटरसायकलवर असलेले विकास , गणेश , प्रीतम खाली कोसळले, त्यात विकास जागीच ठार झाला गणेश व प्रीतम ला मालेगावला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता गणेशचा देखील मृत्यू झाला आहे. सध्या, प्रीतम गंभीर जखमी असून  त्याचा पाय फ्रँक्चर असल्याची माहिती आहे. 

Web Title: Triple seat two-wheeler hit by a truck, killing both in a horrific accident