शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

दर्शनाला आलेल्या भाविकांच्या दुचाकी चोरणारे त्रिकूट जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी व स्थानिक गुन्हे ...

दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी व स्थानिक गुन्हे शाखेला फैलावर घेत गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. पोलीस ठाणे पातळीवर दुचाकी चोरीचे गुन्हे स्वतंत्र अंमलदारांकडे देण्याच्याही सूचना डॉ. मुंढे यांनी दिलेल्या आहेत. दरम्यान, पिंप्री खुर्द, ता. धरणगाव येथील अजय मोरे हा तरुण एरंडोल तालुक्यात पद‌्मालय येथे देवदर्शनाला आलेल्या भाविकांच्या दुचाकी चोरी करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक फौजदार अशोक महाजन, प्रदीप पाटील, दादाभाऊ पाटील, नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, सचिन महाजन, अशोक पाटील व मुरलीधर बारी यांच्या पथकाने संशयित मोरे याचा शोध घेत त्याच्यावर पाळत ठेवली. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने पद‌्मालय येथून दुचाकी चोरी केल्याचे मान्य करून आणखी कल्पेश व नामदेव या दोघांची नावे सांगितली. त्यामुळे पथकाने मोरे याला सोबत घेऊन इतर दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, या तिघांनी आणखी दुचाकी केल्याचा संशय असून पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.

सोयगावचा तरुणही जाळ्यात (फोटो ९)

जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरणाऱ्या अतुल संजय इंगळे (२५, रा.गलवाडे, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) यालाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी अटक केली. त्याच्याकडूनही दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्याला जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.