चारचाकी, दुचाकी अपघातात तीन जण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 21:28 IST2021-07-12T19:50:14+5:302021-07-12T21:28:20+5:30
Accident Case : धनंजय व पंकज हे महेंद्र ॲन्ड महेंद्र कंपनीचे कर्मचारी होते.

चारचाकी, दुचाकी अपघातात तीन जण जागीच ठार
जळगाव : भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत कार चालक प्रवीण प्रकाश पाटील (वय ३२,रा.भराडी, ता.जामनेर) याच्यासह दुचाकीस्वार पंकज मोहन तायडे (वय ३२,रा.कलावसंत नगर, असोदा रेल्वेगेट) व धनंजय गंगाराम सपकाळे (वय ४२,रा.स्टेट बँक कॉलनी, जळगाव) असे तीघं जण ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी साडे तीन वाजता औरंगाबाद मार्गावर पाळधी ते देवपिंप्री दरम्यान घडली. कार चालक जळगाकडून पहूरकडे जात होता तर दुचाकीवरील दोघं जळगावला येत होते.
सपकाळे हे जळगाव येथील फॉर्च्यून फायनान्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक तर तायडे विक्री प्रतिनिधी होते. शेंदूर्णी येथे कार्यालयीन काम आटोपून घराकडे परत येत असताना हा अपघात झाला. त्यात प्रवीण पाटील व धनंजय सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला तर पंकज याला जळगावला आणत असताना रस्त्यात मृत्यू झाला. अपघात इतका गंभीर होता की त्यात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला असून दुचाकीवरील दोघांच्या हातापायाचे तुकडे पडले आहेत.