धुळे : एलबीटी कर महापालिका क्षेत्रात चुकविणार्या चार व्यापार्यांकडून तपासणी पथकाने तीन लाख रुपयांच्या दंड वसुलीची कारवाई आज केली.शहरात वाहनांद्वारे माल आणताना एलबीटी कर चुकविणार्या व्यापारी व व्यावसायिकांवर कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती महापालिका प्रशासनाने केली आहे. या पथकाने मंगळवारी सतीदेवी प्लायवूडच्या व्यापार्याकडून ४३६६ रुपये, आसाराम टी. प्रोसेसिंगकडून २६00 रुपये, नवकार पॉलिनरकडून ९000 रुपये व स्टेशन रोडवरील देशी दारू विक्रेत्याकडून २ लाख ८३ हजार ७९४ रुपयांचा कर वसूल केला. अधीक्षक किशोर सुडके, आर.बी. सोनवणे, एस.डी. वाडिले, बी.एम. कुलकर्णी, संजय आगलावे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}