भुसावळात सट्टा खेळताना तिघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:11 IST2021-06-18T04:11:59+5:302021-06-18T04:11:59+5:30

भुसावळ : शहरात अवैध धंदे बोकाळले असून बाजारपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सट्टा खेळत असताना पोलिसांनी ...

Three arrested while betting in Bhusawal | भुसावळात सट्टा खेळताना तिघे ताब्यात

भुसावळात सट्टा खेळताना तिघे ताब्यात

भुसावळ : शहरात अवैध धंदे बोकाळले असून बाजारपेठ व शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर सट्टा खेळत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सातारा ब्रिजच्या पुढे कॉसमॉस बँकेजवळ सट्टा सुरू असल्याची माहिती शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. यानंतर एएसआय ईकबाल सय्यद, हवालदार साहिल तडवी, कॉन्स्टेबल सोपान पंडित पाटील, पोलीस नाईक विकास यशवंत बाविस्कर आदींच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. संशयितांकडून तीन हजार शंभर रुपये रोख, कल्याण मटक्याच्या १० चिठ्ठ्या व बॉलपेन जप्त केला.

याप्रकरणी पोलीस नाईक विकास यशवंत बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अभिजित दिलीप मराठे (४०) रा. न्यू सातारा, कॉसमॉस बँकेजवळ, विजय रंगनाथ अय्यर (४२), न्यू सातारा, कॉसमॉस बँकेजवळ, अमजत शरीफ खान (२६) मकरा अपार्टमेंट (शिवाजी नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Three arrested while betting in Bhusawal