शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

विनंती बदल्या झालेल्यांना कार्यमुक्ती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 12:27 IST

जि़ प़ : मनुष्यबळाचा अभाव, पर्यायी व्यवस्था नसल्याने कर्मचारी थांबविले

जळगाव : जून महिन्यात विनंती बदल्या झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाच-सहा महिने उलटूनही अद्यापही कार्यमुक्त करण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे़ जिल्हा परिषदेत मनुष्यबळाचा अभाव असल्याने या कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी थांबवून ठेवल्याची माहिती आहे़जिल्हा परिषदेत अधिकारी व कर्मचारी नसल्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून प्रकर्षाने समोर आला आहे़ शासनस्तरावरून पदे भरली जात नसल्याने मनुष्यबळाचा अभाव वारंवार जाणवत आहे़ अशातच जून-जुलैमध्ये समुदपदेशनाने बदली प्रक्रिया राबविण्यात आली होती़ तीन दिवस ही प्रक्रिया चालली होती़ यंदा आचारसंहितेमुळे बदल्यांचा कार्यक्रम दोन महिने विलंबाने झाला होता़ १ ते ७ जून दरम्यान ही सर्व प्रक्रिया राबविण्यात आली होती़ यात प्रशासकीय व विनंती अशा स्तरांवर या बदल्या करण्यात आल्या होत्या़ बदल्यांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून समुपदेशनाद्वारे या प्रक्रिया पार पडल्या होत्या़ यातील प्रशासकीय बदल्या झालेल्यांना कार्यमुक्त करून नियुक्तीच्या ठिकाणी पाठविण्यात आले. मात्र, विनंती बदली झालेल्या साधारण चाळीसटक्के कर्मचाºयांना कार्यमुक्त करण्यात आलेले नसल्याचे समजते़ जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागातच असे तीन कर्मचारी आहेत मात्र, त्याठिकाणी पर्यायी कर्मचारी नसल्याने त्यांना कार्यमुक्त केल्यास विभागाच्या कामांवर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे़ शिवाय शिक्षण विभागातही असे काही कर्मचारी आहेत यासह आरोग्य विभागातीलही अनेक कर्मचाºयांना कार्यमुक्त न केल्याने हा मुद्दा संघटनेच्या बैठकीतही चर्चीला गेला होता़अशा झाल्या होत्या बदल्यायंदा विनंती बदलीसाठी पाच ऐवजी तीनच वर्ष सेवेचे निकष असल्यामुळे सुमारे २०० कर्मचारी या बदलीस पात्र होते़ दरम्यान, या बदली झालेल्या कर्मचाºयांपैकी तीस ते चाळीस टक्के कर्मचारी आहे त्याच ठिकाणी थांबून असल्याचे समजते़प्रशासकीय बदल्या झालेल्यांना कार्यमुक्त केलेले आहे़ विनंती बदल्या ज्यांच्या होत्या अशा काही ठिकाणी पर्यायी व्यवस्था नसल्याने त्यांना सोडण्यात आलेले नाही़ सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील हे प्रशिक्षावरून परतल्यानंतर हा मुद्दा मांडला जाणार आहे़-के़ बी़ रणदिवे, डेप्युटी सीईओ

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव