शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

बैल थकल्यानंतर चोरट्यांनी सोडले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 4:49 PM

चोरीस गेलेले चार बैल व बैलगाडी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या तपास चक्रामुळे शिरपूरजवळील आमोदे येथे बैल थकल्याने रस्त्यावर सोडून दिल्याने बेवारस स्थितीत मिळाले.

ठळक मुद्देकजगाव येथून गेले चोरीसचोरीस गेलेले बैल मिळाले परत

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : चोरीस गेलेले चार बैल व बैलगाडी पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या तपास चक्रामुळे शिरपूरजवळील आमोदे येथे बैल थकल्याने रस्त्यावर सोडून दिल्याने बेवारस स्थितीत मिळाले.सूत्रांनुसार, ६ रोजी येथील सी.टी. पाटील नगरजवळील पप्पूू अमृतकर यांच्या शेतातून त्यांच्या मालकीचे चार बैल व एक बैलगाडी असा पावणेदोन लाख रुपये किमतीचे बैल व बैलगाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे शेतकरी व ग्रामस्थांत घबराट पसरली होती. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दिल्यानंतर भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपासाची चक्र फिरविली. याप्रमाणे मिळविलेल्या माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांना योग्य त्या सूचना देत योग्य दिशेने तपासावर पाठविले. दि.९ रोजी दुपारी शिरपूरजवळील आमोदे येथे रस्त्याच्या कडेला बेवारस स्थितीत मिळाले. पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्यासह बैल व बैलगाडी मालक पप्पू अमृतकर, संदीप पाटील, भूषण पाटील हे तपासासाठी सोबत होते. दुपारी सदर बैल व बैलगाडी ट्रकद्वारे कजगाव येथे आणण्यात आले

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhadgaon भडगाव