गावातील पाटलांच्या घरात भरदिवसा चोरी, दोन लाखांचे दागिने लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2020 22:59 IST2020-12-31T22:58:49+5:302020-12-31T22:59:35+5:30

किशोर हे गुरुवारी सकाळी ते शेतात गेले होते. दुपारी त्यांची पत्नी गावातील नातेवाईकांकडे गेल्या होत्या.

Theft all day, two lakh jewelery lamps in amalner jalgaon | गावातील पाटलांच्या घरात भरदिवसा चोरी, दोन लाखांचे दागिने लंपास 

गावातील पाटलांच्या घरात भरदिवसा चोरी, दोन लाखांचे दागिने लंपास 

अमळनेर जि. जळगाव  : घरात कुणीच नसल्याचा संधी साधत चोरट्याने घराचे कुलूप उघडून दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवार रोजी दुपारी २ वाजता फापोरे ता. अमळनेर येथे घडली. किशोर युवराज पाटील यांच्या घरात ही चोरी झाली.

किशोर हे गुरुवारी सकाळी ते शेतात गेले होते. दुपारी त्यांची पत्नी गावातील नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यापूर्वी  त्यांनी घराला कुलूप लावून किल्ली तुळशी वृंदावन खाली ठेवली. दुपारी तीन वाजता त्या परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी  लोखंडी कपाटातील  नेकलेस, दोन सोनसाखळी इतर दागिने असा एक लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.  चोरट्याने घरातील वस्तू अस्ताव्यस्त करताना चांदीचे दागिने व इतर वस्तू यांना हात लावला नाही.  किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Theft all day, two lakh jewelery lamps in amalner jalgaon