‘लम्पी’ची बाधा, पशुधनाच्या बळींची संख्या शंभरीपार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 03:59 PM2023-08-29T15:59:27+5:302023-08-29T15:59:45+5:30

११६ मृत्यू, ५१७ जनावरांवर उपचार सुरु

The problem of 'Lumpi', the number of victims of livestock is over a hundred! | ‘लम्पी’ची बाधा, पशुधनाच्या बळींची संख्या शंभरीपार!

‘लम्पी’ची बाधा, पशुधनाच्या बळींची संख्या शंभरीपार!

googlenewsNext

कुंदन पाटील, जळगाव: ‘लम्पी’ आजारामुळे मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ११६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ५१७ बाधीत जनावरांवर उपचार सुरु असून मंगळवारी लसीकरणही १०० टक्के पूर्ण झाले आहे.गेल्यावर्षी जामनेर तालुक्यात ‘लम्पी’ची सर्वाधिक बाधा झाली होती. यावर्षी मात्र चाळीसगावपासून ‘लम्पी’ने पाय पसरावयला सुरुवात केली. त्यामुळे आतापर्यंत १५८३ जनावरांना ‘लम्पी’ची लागण झाली. त्यातील ९४५ जनावरांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तर सद्यस्थितीला ५१७ जनावरे बाधीत आहेत. तर आतापर्यंत ११६ जनावरांचा बळी गेला आहे. त्यात सर्वाधिक बळी चाळीसगाव तालुक्यात गेले आहेत. जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यातील जनावरांवर ‘लम्पी’ने आक्रमण केले आहे.

तालुकानिहाय बाधीत जनावरे व मृत्यू संख्या

  • धरणगाव-२४-०१
  • पारोळा-५२-११
  • जळगाव-०८-०१
  • एरंडोल-७१-०९
  • पाचोरा-१०३-११
  • चोपडा-०४-००
  • चाळीसगाव-१७०-७३
  • भडगाव-२९-०७
  • अमळनेर-५०-०२
  • जामनेर-०३-०१

 

Web Title: The problem of 'Lumpi', the number of victims of livestock is over a hundred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.