सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 10:12 AM2024-06-15T10:12:10+5:302024-06-15T10:12:39+5:30

Saba azad: इंडस्ट्रीतील सर्वात चर्चिली जाणारी जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. परंतु, हृतिकमुळे चर्चेत राहणाऱ्या सबाला मात्र त्याच्यामुळेच काम मिळणं कठीण झालं आहे.

saba-azad-revealed-she-was-not-getting-voice-over-work-for-two-years-due-to-dating-hrithik-roshan | सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...

सबाच्या करिअरमध्ये हृतिकचा अडथळा?; दोन वर्ष मिळालं नाही काम, म्हणाली...

बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. सुझैन खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर हृतिक सध्या  सबा आझाद (Saba Azad) हिला डेट करत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही जोडी एकमेकांना डेट करत असून त्यांचं नातं त्यांनी जाहीरपणे मान्य केलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रीतील सर्वात चर्चिली जाणारी जोडी म्हणून या दोघांकडे पाहिलं जातं. परंतु, हृतिकमुळे चर्चेत राहणाऱ्या सबाला मात्र त्याच्यामुळेच काम मिळणं कठीण झालं आहे.

सबाने अलिकडेच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये तिने हृतिकमुळे गेल्या २ वर्षांपासून काम मिळत नसल्याचं तिने म्हटलं आहे. मागील २ वर्षापासून सबाला व्हॉइस ओव्हरचं काम न मिळाल्यामुळे तिने संतापही व्यक्त केला आहे. सबाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सबाने रेकॉर्डिंग रुममधील एक फोटो शेअर केला आहे. त्यानंतर तिला २ वर्षानंतर काम मिळाल्याचं म्हणत तिने पोस्ट शेअर केली आहे.  "जवळपास २ वर्षांपेक्षा जास्त काळानंतर वॉइस रेकॉर्ड करत आहे. आपण अजूनही अशा काळात राहतोय का, जिथे एका स्त्रिला यशस्वी लाइफ पार्टनर भेटल्यानंतर तिला स्वत:च्या कष्टाची कमाई करावी लागत नाही? असा अजूनही समज आहे. किंवा, तिला घरभाड किंवा बील भरण्याची गरज लागत भासत नाही? वा, तिला स्वत:च्या कामाचा अभिमान बाळगावा किंवा तिने तिच्या घरची जबाबदारी घ्यावी? याची कशाचीच गरज नसावी असं वाटतं?", असा सवाल सबाने विचारला आहे.

पुढे ती म्हणते, "हे कसली अशी जुनाट विचारसरणी आहे. मी बेसिकली माझं सगळं करिअर गमावलं ज्याच्यावर माझं खूप प्रेम होतं. लोकांना असं वाटायला लागलं होतं की आता मला काम करण्याची गरज नाही. हे खूप वाईट आहे की, हे एक डाइमेंशनल पॅटरियारकल आणि मागसलेली विचारसरणी आहे. ज्या लोकांना माहित नाहीये त्यांच्यासाठी सांगते, स्वत:च्या पायावर उभे असलेले जे दोन लोक एकत्र येतात तेव्हा ते कधीच त्यांचं करिअर सोडत नाहीत. ते कायम त्यांची ओळख निर्माण करत असतात."

दरम्यान, "मला अजूनही स्वत:च्या पैशात कमावलेलंच खायचं आहे. मी अजूनही माझं व्हीओचं काम करतीये. आणि, प्लीज तुमची विचारसरणी बदला", असंही सबाने म्हटलं आहे.

Web Title: saba-azad-revealed-she-was-not-getting-voice-over-work-for-two-years-due-to-dating-hrithik-roshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.