Aaditya Thackeray : जळगावात राजकारण तापलं! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 09:58 AM2022-08-20T09:58:36+5:302022-08-20T10:08:41+5:30

Aaditya Thackeray : धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे.

The banner welcoming Yuva Sena chief Aditya Thackeray was torn in jalgaon | Aaditya Thackeray : जळगावात राजकारण तापलं! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

Aaditya Thackeray : जळगावात राजकारण तापलं! युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

Next

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, ते जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडखोरांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील आणि चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावात राजकारण तापलं आहे.

धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. बॅनर फाडल्याने मध्यरात्रीनंतर तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे शिवसैनिक प्रचंड संतप्त झाले होते. पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच धाव घेतली त्यामुळे अनर्थ टळला आहे. 

Web Title: The banner welcoming Yuva Sena chief Aditya Thackeray was torn in jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.