शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

6 मिनिटांच्या लघुपटाद्वारे मांडला सासरा व जावयाच्या नात्यातील तणाव

By admin | Updated: May 3, 2017 12:33 IST

लघुपटाद्वारे होतेय अमळनेरात हगणदरीमुक्तीबाबत जनजागृती : प्रसाद महाराजांच्या हस्ते अनावरण

 अमळनेर,दि.3- सध्या सर्वत्र स्वच्छता व गाव हगणदारीमुक्तीला प्राधान्य दिले जात आहे. याच अनुषगांने अमळनेरातील लोकमतचे छायाचित्रकार महेंद्र पाटील यांनी ‘जावयाचा वांधा.. शौचालय बांधा.’ ही लघुचित्रफित (शॉर्टफिल्म) तयार केली आहे. या चित्रफितीद्वारे स्वच्छता व हगणदारीचे महत्व पटवून दिले आहे.

अमळनेर पालिकेने शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी कठोर पावले उचलून, अनेकांवर कारवाई केली. त्यामुळे शहराची वाटचाल हगणदारीमुक्तीकडे होण्यास मदत झाली. हीच बाब लक्षात घेऊन अंबिका फोटोचे संचालक व लोकमतचे छायाचित्रकार महेंद्र पाटील यांनीही सहा मिनिटांची चित्रफित तयार केली.
शौचालय नसल्याने सासरे व जावाई या नाजुक नात्याला कसा तडा जातो, हे या चित्रफितीतून प्रभावीपणे मांडले आहे. या चित्रफितीत प्रवीण माळी (अडावद) यांनी जावायाची भूमिका साकारली आहे.  बंडू देशमुख, प्रमोदिनी पाटील यांनी सासरे-सासूची भूमिका साकारली आहे. त्यांना  समाधान सोनार, खुशी वानखेडे, गौरव पवार, भटू पाठक, हरिचंद्र पाटील यांनी सहकार्य केले आहे.
या चित्रफितीची कथा, संकल्पना, दिग्दर्शन महेंद्र पाटील यांनी केली आहे. तर छायांकन व संकलन गौरव शुक्ल, महेंद्र पाटील यांनी केले. निर्मिती प्रमुख योगेश कासार व दर्शन जैन  यांनी केले. तर संगीत व डबिंग- प्रसाद देशपांडे विशाल वानखेडे यांनी केले.  कला दिग्दर्शन गौरव पवार, विवेक बि:हाडे, पवन चौधरी यांनी केले. तर सहाय्यक ऋषिकेश मराठे, संदीप अहिरराव, सँडी संदानशिव, संदीप भोई यांनी केले.
यासाठी अमळनेर नगरपरिषद, अगिAशमन पथक, पोलीस स्टेशन, रवी पेंटर पैलाड, शशिकांत अंधारे, निशांत नेरकर, किरण बागुल यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र शासनाने या चित्रफितीची दखल घ्यावी अशी अपेक्षा महेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे.
या शॉर्टफिल्मचे अनावरण अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर वाडी संस्थानचे गादीपती ह.भ.प.प्रसाद महाराज यांच्या हस्ते झाले. या चित्रफितीच्या शुभारंभ प्रसंगी आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील, उपविभागिय अधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, मुख्याधिकारी पी.जी.सोनवणे, उपअधीक्षक रमेश पवार उपस्थित होते.