शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
3
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
4
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
5
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
6
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
7
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
8
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
9
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
10
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
11
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
12
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
13
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
14
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
15
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
16
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
17
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
18
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
19
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
20
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांसाठीचे टी.बी. रूग्णालय बनले घंटागाडीचे उपचार केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

- टी.बी.च्या रुग्णांच्या विलगीकरणासाठी हे रुग्णालय सन १९६२ मध्ये बांधण्यात आले होते. मात्र, १९९० नंतर टी.बी.चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ...

- टी.बी.च्या रुग्णांच्या विलगीकरणासाठी हे रुग्णालय सन १९६२ मध्ये बांधण्यात आले होते. मात्र, १९९० नंतर टी.बी.चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या रुग्णालयाचाही वापर कमी होवू लागला. १९९६ पासून हे रुग्णालय बंद असून, याठिकाणी ५२ क्वार्टर धुळखात पडले आहेत. सद्यस्थितीला रूग्णालयच्या बहुतांश क्वार्टरची दरवाजे, खिडक्या तुटलेल्या आहेत. जागो-जागी कचरा साचला आहे.

- नादुरूस्त वाहने पडून

महापालिकेच्या सर्व घंटागाड्या रूग्णालयाच्या आवारात थांबविल्या जातात. त्याचबरोबर भंगार व तुटलेल्या कचरा पेट्या सुध्दा याठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच ना दुरूस्त घंटागाड्या, ट्रॅक्टर तसेच कचरा गोळा करणारे मिनी ट्रक पडून आहेत. सध्या यासाठी जागेचा वापर होत आहे.

- वृक्षांची कत्तल

रूग्णालयाच्या मागील भागात दोन ते तीन वृक्षांची कत्तल केलेली लोकमत प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत आढळून आले. हा भाग उजाड पडला असून जागो-जागी गवत उगवलं आहे. मागील भागातील भींत तुटलेली असल्यामुळे या आवारात कुणी ये-जा करू शकते़ मात्र, या आवारात तीन ते चार सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असल्याचे बघायला मिळाले.

- काय आहे भुमिका

मनपाची टी़बी़ रूग्णालयाची कोट्यावधी रूपयांची जागा उजाड पडून आहे. या रूग्णालयाच्या दुरूस्तीबाबत गांभीर्य घेतले गेले तर, भविष्यात हे रूग्णालय जळगावकरांसाठी फायदेशिर ठरू शकते, अशी लोकमतची भुमिका आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता क्वारंटाईन केलेल्यांसाठी या रुग्णालयात चांगली व्यवस्था करता आली असती, असा पयार्यही लोकमतने मनपा प्रशासनाला सुचविला होता.