तरुणांवर विळ्याने हल्ला करणार्या संशयिताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST2021-01-25T04:17:30+5:302021-01-25T04:17:30+5:30

पिंप्राळा शिवारात जितेंद्र कोळी यांचे शेत आहे. या शेतात काही दिवसांपूर्वी सुपडू ठाकरे याच्या मालकीचे घोडे चरायला आले होते. ...

Suspect arrested for assaulting youths | तरुणांवर विळ्याने हल्ला करणार्या संशयिताला अटक

तरुणांवर विळ्याने हल्ला करणार्या संशयिताला अटक

पिंप्राळा शिवारात जितेंद्र कोळी यांचे शेत आहे. या शेतात काही दिवसांपूर्वी सुपडू ठाकरे याच्या मालकीचे घोडे चरायला आले होते. त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले होते. याबाबत जितेंद्र कोळी हे १८ जानेवारी रोजी सुपडू ठाकरे याच्याकडे गेले. त्यांनी तुझे घोडे शेतात चरून पिकांचे नुकसान करत असल्याचे सांगून यापुढे असे व्हायला नको असेही कोळी म्हणाले. याचा राग आल्याने ठाकरे व मिलिंद मितेश जाधव या दोघांनी जितेंद्र कोळी याच्यावर विळ्याने हल्ला केला होता. याप्रकरणी जखमी जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या जबाबावरुन सुपडू चंदक्रांत ठाकरे व मितेश मिलिंद जाधव याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान यातील संशयित सुपडू ठाकरे याच्याबाबत कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांना माहिती मिळाली. त्यानुसार शिवाजी धुमाळ, विजय खैरे, उमेश पवार, रवींद्र चौधरी यांच्या पथकाने संशयित ठाकरे यास रविवारी अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मिलिंद जाधव याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Suspect arrested for assaulting youths