सूरज झंवरचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:17 IST2021-05-06T04:17:30+5:302021-05-06T04:17:30+5:30

जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे कारागृहात असलेल्या सूरज सुनील झंवर (रा. जयनगर, जळगाव) याचा ...

Suraj Zanwar's bail application rejected | सूरज झंवरचा जामीन अर्ज फेटाळला

सूरज झंवरचा जामीन अर्ज फेटाळला

जळगाव : बीएचआर फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे कारागृहात असलेल्या सूरज सुनील झंवर (रा. जयनगर, जळगाव) याचा जामीन अर्ज बुधवारी पुणे विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.

पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने बीएचआर पतसंस्थेच्या अपहार व फसवणूक प्रकरणात सूरज झंवर यास अटक केली होती. संशयित सूरज झंवर सद्य:स्थितीत न्यायालयीन कोठडीत पुणे येथील कारागृहात आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने घेतलेले रिमांड हे बेकायदेशीर असल्याबाबत ते रद्द करण्यात यावे यासाठी सूरज झंवर याने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद करताना संशयित सूरज झंवर याचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग आहे. तसे पुरावेही आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केले असल्याचे सांगितले. व त्याच्या जामिनास विरोध केला. दोन्ही बाजूच्या युक्तिवादाअंती पुणे न्यायालयाने निकाल देत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Web Title: Suraj Zanwar's bail application rejected