सीए अंतिम परीक्षेत मानसी, योगिता, आदित्यचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:57 IST2021-02-05T05:57:40+5:302021-02-05T05:57:40+5:30

मानसी काबरा - ०४ सीटीआर ५७ योगिता राठी - ०४ सीटीआर ५८ आदित्य न्याती - ०४ सीटीआर ५६ ...

Success of Mansi, Yogita, Aditya in CA final exam | सीए अंतिम परीक्षेत मानसी, योगिता, आदित्यचे यश

सीए अंतिम परीक्षेत मानसी, योगिता, आदित्यचे यश

मानसी काबरा - ०४ सीटीआर ५७

योगिता राठी - ०४ सीटीआर ५८

आदित्य न्याती - ०४ सीटीआर ५६

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियातर्फे ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील मानसी दीपक काबरा, याेगिता अभिलाष राठी व आदित्य न्याती या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

कोरोनाचे नियम पालन करून नोव्हेंबर २०२० मध्ये सीएची अंतिम परीक्षा घेण्यात आली़ देशभरातील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेचा सोमवारी आयसीएआयने निकाल जाहीर केला. त्यात मानसी काबरा ही ४६० तर शांतीनगरातील आदित्य संदीप न्याती हा ४४८ गुण मिळवून सीएची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. मानसी ही दीपक व अ‍ॅड. मनीषा काबरा यांची कन्या आहे. तसेच इचलकरंजीचं माहेर अन् जळगावचं सासर असलेल्या योगिता राठी यांनीही परीक्षेत यश मिळविले आहे. या परीक्षेसाठी पती अभिलाष राठी व दीर यश यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.

Web Title: Success of Mansi, Yogita, Aditya in CA final exam