तांबापुरात पुन्हा दगडफेक

By Admin | Updated: June 16, 2017 10:42 IST2017-06-16T10:42:32+5:302017-06-16T10:42:32+5:30

पूर्व वैमनस्यातून वाद : लोखंडी रॉडने मारहाण केल्याने तीन जण जखमी

Stoning again in Tambur | तांबापुरात पुन्हा दगडफेक

तांबापुरात पुन्हा दगडफेक

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.16 : शहरातील तांबापुरा येथे पूर्व वैमनस्यातून एकाच कुटुंबांतील दहा ते बारा जणांनी दोन तरूणांवर लोखंडी रॉड व लाकडी दांडय़ाने हल्ला चढविल्याची घटना रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली़ यावेळी दगडफेक झाल्याने तांबापु:यात पळापळ झाली. 
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत एका गटाचा इच्छादेवी चौकात रास्तारोकोचा डाव उधळून लावला़ या घटनेने तांबापु:यात तणाव निर्माण झाला. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आह़े दरम्यान, 6 जून रोजीही तांबापुरात पूर्ववैमनस्यातूनच दगडफेक झाली होती.आठ दिवसात दुस:यांदा दगडफेकीची घटना घडल्याने रहिवासी भयभीत झाले आहेत.
हल्ल्यात फिरोज खान अजीझ खान (वय 35) व  वसीमखान अजीझ खान (वय 28) हे दोघे रा़ पंचशील नगर हे जखमी झाले असून दोघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़
फिरोज गंभीर जखमी असून त्याच्या डोक्यात 18 टाके पडले आहेत़ तर वसीम याला डोक्याच्या मागील बाजूस लाकडी दांडय़ाचा मुका मार बसला  आह़े दोघांवर उपचार सुरू आहेत़
 

Web Title: Stoning again in Tambur