भावी पिढी शाबूत ठेवण्यासाठी शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST2021-07-18T04:12:31+5:302021-07-18T04:12:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : दीड वर्षापासून विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा आनंद हिरावला गेला होता. आपली भावी पिढी आणि ...

Start a school to keep future generations alive | भावी पिढी शाबूत ठेवण्यासाठी शाळा सुरू करा

भावी पिढी शाबूत ठेवण्यासाठी शाळा सुरू करा

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : दीड वर्षापासून विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा आनंद हिरावला गेला होता. आपली भावी पिढी आणि गाव शाबूत ठेवण्यासाठी सर्व शाळा सुरू व्हाव्यात ही अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीवरील मरगळ झटकण्यासाठी शाळा सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी मुख्याध्यापक, ग्रामसेवक व सरपंचाच्या संयुक्त बैठकीत केले.

तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाशून्य असला तरी ६४ पैकी फक्त ३७ ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याबाबत ठराव दिले होते. त्या अनुषंगाने आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी. एस. हायस्कूलमध्ये सरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. व्यासपीठावर संस्थाचालक जयवंतराव पाटील, रवींद्र पाटील, गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे, शिक्षण विस्तार अधिकारी पी. डी. धनगर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा कौन्सिल सदस्य तुषार बोरसे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष आर. जे. पाटील, केंद्रप्रमुख शरद सोनवणे हजर होते.

यावेळी विद्यार्थ्यांना जिल्हा बँकेत शून्य बॅलन्सवर खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा बँक संचालक म्हणून अनिल पाटील यांचा व सुटीत सानेगुरुजींच्या कथा ऐकवून मुलांवर संस्कार घडविल्याबद्दल दत्तात्रय सोनवणे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन यांनी केले. दत्तात्रय सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Start a school to keep future generations alive