राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

By Admin | Updated: January 12, 2015 13:33 IST2015-01-12T13:31:50+5:302015-01-12T13:33:24+5:30

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात रविवारपासून झाली.

Start of National Road Safety Campaign | राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानास प्रारंभ

नंदुरबार : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात रविवारपासून झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात राष्ट्रीय सुरक्षा अभियान-२0१५ चा शुभारंभ जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या हस्ते झाला. 
या वेळी अपर पोलीस अधीक्षक अनिता पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सुभाष बोरसे, राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगाराचे व्यवस्थापक संजय ढगे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, नंदुरबार शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक एम.बी. खडके, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, बलवंत जाधव, चंद्रशेखर बेहेरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
युवकांनी रस्त्यावर वाहन चालविताना वेग र्मयादित ठेवून वाहन चालवावे. वाहन चालविताना मोबाइलवरून बोलणे टाळावे. अपघात झाल्यास अपघातात आपलेच नाही तर दुसर्‍याचेही नुकसान होत असते. अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. 

Web Title: Start of National Road Safety Campaign