मुलाला अटक झाली, वडिलांनी घरातच आयुष्य संपवले; जळगावमधील घटना, असं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 20:01 IST2025-10-07T19:59:36+5:302025-10-07T20:01:31+5:30
Jalgaon Crime News : जळगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी मुलाला एका प्रकरणात अटक केल्यानंतर वडिलांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलाला अटक झाली, वडिलांनी घरातच आयुष्य संपवले; जळगावमधील घटना, असं काय घडलं?
Father Ends life after Son arrested: मुलाला अटक झाल्याचा धक्का सहन न झाल्याने एका व्यक्तीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगाव तालुक्यातील भोकर गावात ही घटना घडली. आत्माराम प्रल्हाद सपकाळे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुलाला एका गुन्ह्यात अटक झाल्याच्या दोन दिवसांनंतर वडील आत्माराम सपकाळे ५ ऑक्टोबर रोजी टोकाचा निर्णय घेतला. ही घटना रात्री उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या मजल्यावर गेले अन् गळफास घेतला
रविवारी सायंकाळी सात वाजता आत्माराम सपकाळे हे दुसऱ्या मजल्यावरील खोलीत गेले. त्यानंतर त्यांनी गळफास घेतला. कुटुंबातील व्यक्ती त्या खोलीत गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यांचा मृत्यू घरीच झालेला होता, असे डॉक्टरांनी सांगितले.
भादली गावात झालेल्या वादाच्या घटनेत तालुका पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, यात भोकर येथील हर्षल आत्माराम सपकाळे (१८) याचाही समावेश आहे. त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आले होते.