शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

गाळेप्रश्नी सरकारला ताकद दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:54 IST

कॅटचे राष्ट्रीय संघटन मंत्री ललित गांधी : जळगावात व्यापारी मेळावा उत्साहात जळगाव : शहरासह राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रात ...

कॅटचे राष्ट्रीय संघटन मंत्री ललित गांधी : जळगावात व्यापारी मेळावा उत्साहात

जळगाव : शहरासह राज्यातील अनेक महापालिका क्षेत्रात मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांच्या नूतनीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवणार नाही तोपर्यंत सरकार आपली दखल घेणार नाही. निवेदने देऊन काहीही होणार नाही. त्यामुळे शासनाच्या मागे लागून कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मार्ग नाही, असे प्रतिपादन व्यापाऱ्यांची शिखर संस्था कॅटचे राष्ट्रीय संघटन ललित गांधी यांनी केले.

कॅट, जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ, जिंदा, लघु उद्योग भारती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित व्यापाऱ्यांचा मेळावा शुक्रवारी पांझरापोळ संस्थानमध्ये झाला, त्यावेळी ते बोलत होते. व्यापारी मेळाव्याच्या व्यासपीठावर राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जळगाव जिल्हा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय काबरा, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे, लघु उद्योग भारतीचे किशोर ढाके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे विभागीय अध्यक्ष संजय दादलिका, कॅटचे जिल्हाध्यक्ष संजय शाह आदी उपस्थित होते.

जीएसटी पोर्टलमुळे मनस्ताप वाढला

उद्योग क्षेत्रात आपण पुढे आलो, पण आज जेवढा वेळ व्यवसाय, व्यापाराला देतो त्यापेक्षा जास्त वेळ जीएसटीच्या कागदपत्रांची पूर्तता करायला द्यावा लागतो. जीएसटी कायद्यात आजवर शेकडो सुधारणा करण्यात आल्या; परंतु अजूनही तो कायदा सुटसुटीत नाही. जीएसटी पोर्टल एकही दिवस व्यवस्थित चालत नाही. मुळात करप्रणालीतील पूर्ण यंत्रणाच भ्रष्टाचारी आहे. व्यापाऱ्यांची सहनशीलता संपली आहे, असे मत ललित गांधी यांनी व्यक्त केले.

विमानसेवा सुरळीत केल्यास फायदा होईल

जळगाव विमानतळ कार्यान्वित झाले असले तरी अद्यापही विमानसेवा सुरळीत झालेली नाही. जळगाव विमानसेवेला मुंबई येथे स्लॉट उपलब्ध करून घ्यावे, तसेच जळगाव-पुणे, जळगाव-इंदूर विमानसेवा सुरू करावी यासाठी पाठपुरावा करण्याचा मुद्दा पुरुषोत्तम टावरी यांनी मांडला. तसेच जीएसटीविषयी सविस्तर विवेचन करून कर सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश लोढा यांनी ५० पानी निवेदन ललित गांधी यांना दिले. सूत्रसंचालन दिलीप गांधी यांनी केले तर किशोर ढाके यांनी आभार मानले.

गाळेधारक संघटनेतर्फे निवेदन

जळगावातील सर्व गाळेधारकांच्या समितीतर्फे संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात ललित गांधी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाद्वारे गाळेधारकांचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करीत तो प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी करण्यात आली.

कॅट जिल्हाध्यक्षपदी संजय शाह

जळगावात आयोजित मेळाव्याप्रसंगी जळगाव जिल्हा कॅटच्या अध्यक्षपदी संजय शाह यांची निवड करण्यात आल्याचे ललित गांधी यांनी जाहीर केले.