शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक.. सावत्र बापाकडून मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सावत्र बापाने २० वर्षीय उच्चशिक्षित मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, संशयितास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सावत्र बापाने २० वर्षीय उच्चशिक्षित मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, संशयितास गुरुवारी अटक करण्यात आली आहे. वारंवारच्या त्रासामुळे पीडितेने घर सोडत पुण्याला रवाना झाली. त्याठिकाणी सावत्र बापाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी २० वर्षीय तरुणी बीसीएच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. २३ जानेवारी २०१४ रोजी पीडित मुलीच्या आईचा दुसरा विवाह झाला. त्यावेळी पीडिता १३ वर्षांची होती. आई,वडील, आजी-आजोबा व लहान बहीण असे एकत्र एकाच घरात वास्तव्य करीत होते. त्यानंतर दोन वर्षांनी सावत्र बाप मुलीला वाईट अर्थाने स्पर्श करू लागला. त्याकडे मुलीने दुर्लक्ष केले. एक-दोन वेळा झाल्यानंतर मुलीने नकार दिला असता चुकून झाले असे तो सांगायचा.

वाढदिवसाच्याच दिवशी अत्याचार

१७ फेब्रुवारी २०१९ रोजी पीडितेचा वाढदिवस होता. त्यादिवशी पीडितेची आई लहान बहिणीला घेऊन स्विमिंगला गेली होती. त्यावेळी पीडिता, आजी- आजोबा व सावत्र बाप असे घरी होते. आजी, आजोबा दुसऱ्या खोलीत असताना सावत्र बापाने जबरदस्ती शारीरिक संबंध केले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुझ्या आई व बहिणीला जीवे ठार मारून टाकेल, अशी धमकी दिली. सप्टेंबर २०१९ मध्ये पोटात दुखायला लागल्याने आई-वडील हे स्त्रीरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात पीडितेची आई घरी नसताना तसेच आई झोपेत असताना सावत्र बापाने पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध केले. त्यावेळीदेखील आईला मारण्याची धमकी देण्यात आली. या भीतीने रात्री झोपताना पीडिता आईजवळ जायला लागली असता मुलगी आपल्यात फूट पाडत असल्याचे पत्नीला त्याने सांगितले.

आईच्या लग्नाच्या वाढदिवशी झाला प्रकार उघड

२३ जानेवारी रोजी पीडितेच्या आईच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यादिवशी सर्वजण झोपले असता मध्यरात्री २ वाजता उठून सावत्र बापाने पुन्हा अत्याचार केला. तेव्हा आईला जाग आली असता तिने वडिलांच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी आईने मुलीला पुणे येथे आपल्या माहेरी पाठवून दिले. तेथे असतानाही वडील मोबाइलवर अश्लील संदेश पाठवायचे. या प्रकाराने त्रस्त झालेल्या पीडितेने पुण्यातील समुपदेशकाची भेट घेतली. झालेला प्रकार त्यांच्याकडे कथन केला. त्यांनी तिला घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस ठाणे गाठले. तेथे सावत्र बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात मदत करणारी सावत्र बापाच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे. हा गुन्हा गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी संशयित बापाला अटक केली. त्याला दुपारी न्यायालयात हजर केले असता ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील नीलेश चौधरी यांनी बाजू मांडली.