चाळीसगावला वीर जवानाच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 14:16 IST2020-12-22T14:15:12+5:302020-12-22T14:16:29+5:30
वाकडीचे जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांची मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांत्वनपर भेट घेतली.

चाळीसगावला वीर जवानाच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्यांकडून सात्वंन
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : पुंछ येथील सीमेवर कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले वाकडीचे जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांची मंगळवारी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांत्वनपर भेट घेऊन आपल्या शोकभावना व्यक्त केला.
हिमकडा अंगावर कोसळून १९ दिवसांच्या उपचारानंतर अमित पाटील यांना १६ रोजी निधन झाले. पालकमंत्री पाटील यांनी वीरजवान अमित पाटील यांच्या मुळगावी वाकडी येथील घरी जाऊन त्यांचे वडिल साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशाली पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले. वीरजवान अमित पाटील यांना भारतमातेची सेवा करीत असताना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यांनी देशाच्या सेवेसाठी दिलेले बलीदान व्यर्थ जाणार नाही, अशा भावना व्यक्त करुन पालकमंत्री पाटील म्हणाले की, वीरजवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल.
यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे उपजिल्हा संघटक महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश पाटील, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, शहरप्रमुख श्यामलाल कुमावत, सुनील गायकवाड, नकुल पाटील, मोती पाटील, निलेश गायके, वसीम आदी उपस्थित होते.