हाणामारी प्रकरणी सात जणांना अटक व सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:55 IST2019-01-17T00:54:56+5:302019-01-17T00:55:16+5:30
पहूर येथील दोन गटातील वाद

हाणामारी प्रकरणी सात जणांना अटक व सुटका
पहूर, ता. जामनेर : किरकोळ कारणावरून येथील लेलेनगर भागात झालेल्या हाणामारीप्रकरणी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखर करण्यात आला असून सात जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणातील ८ जण फरार आहेत.
बुधवारी संध्याकाळी जळगाव महामार्गावरील एका बारवर दोन जणांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली होती. त्यानंतर लेलेनगर भागात दोन्ही गटाचे शंभर ते दीडशे जण आमनेसामने येऊन हाणामारी करण्यात झाली. यात पो.कॉ.जितेंद्र परदेशी यांच्यासह दोन जण जखमी झाले आहे.
यादरम्यान तिखट मिरची पाऊडर, दगड, लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आल्याने संदीप शेळके, जूबेर शेख नजीर हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हाणामारी दरम्यान विकास चौधरी यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडण्यात येऊन दुचाकीची तोडफोड करण्यात आली.