शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर प्रज्ञाशोध परीक्षेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. इयत्ता दहावीसाठी झालेल्या राज्यस्तरीय चाचणी परीक्षेत जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबर २०२० रोजी ही परीक्षा घेण्‍यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातून ९४३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरम्यान, सोमवारी निवड यादी व शाळानिहाय गुणवत्ता यादी जाहीर करण्‍यात आली आहे. यात राज्यातील ८२१ विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड करण्‍यात आली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राष्ट्रीयस्तर प्रज्ञाशोध परीक्षा दिल्लीतील एसीईआरटीमार्फत घेतली जाणार आहे.

===============

- या राज्यस्तरीय परीक्षेत जळगाव जिल्ह्यातून खुला प्रवर्गातून १७ विद्यार्थी, ओबीसी प्रवर्गातून १७ विद्यार्थी, एससी प्रवर्गातून ०३ विद्यार्थी, तर एसटी प्रवर्गातून ०४ अशा एकूण ४१ विद्यार्थ्यांची राष्ट्रीय परीक्षेसाठी निवड झाली आहे.

- खुला प्रवर्गातून मैत्रज्ञ महेश पाटील, ओम चंद्रकांत चौधरी, विपुल योगेश वंजारी, प्रणाद नीलेश लाखोटे, स्नेहा योगेश पाटील, क्रिष्णा ईश्वर देशमुख, नचिकेत राहुल पाटील, अक्षय भाविक भन्साली, अथर्व प्रशांत पाटील, निश्चय संदीप पाटील, अथर्व नितीन पाटील, भाग्या योगेश अग्रवाल, अनुज अजय पाटील, अनुराग दिलीप ठाकरे, रितांशू देवेंद्र सदाफळे, तन्‍मय शरद माथुरवैश्य, कलश पंकज भय्या आदींनी यश मिळविले आहे.

- ओबीसी प्रवर्गातून अर्णव नितीन पाटील, वेदांत सुनील वंजारी, वेदांत विकास शेलकर, वेदांत कमलेश नेहते, वेद संजय थोरात, कौशल कुंदन वायकोळे, शर्वरी राजेश खरे, किरण संजीव पाटील, साहील सुधीर नारखेडे, प्रणव सुनील पवार, गौरी सुशील राणे, निषाद मधुकर चौधरी, अदिती प्रमोद पिंगळे, राजन सुधीर पाटील, तेजस सतीश नारखेडे, नेहा राजेश भंगाळे, डिंपल सुदीप राणे यांनी यश मिळविले आहे.

- एससी प्रवर्गातून महेश हुकूम बाविस्कर, अथर्व आत्माराम चिमकर, सायली शैलेंद्र नन्नवरे यांनी यश संपादन केले आहे.

- एसटी प्रवर्गातून हिमांशू दिलीप बाविस्कर, अनुजा संतोष ठाकूर, माधवी राजेंद्र कोळी, गौरी काशीराम बारेला यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

=================

आता राष्ट्रीय परीक्षेसाठी तयारी

राज्यस्तरीय फेरीची परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात आली. त्याचा निकाल सोमवारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. लेवल-१ मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. राष्ट्रीयस्तर एनटीएसई परीक्षा एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. संबंधित निवड यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.