शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

कापूस वेचणीमुळे शाळा ओस

By admin | Updated: November 20, 2014 14:41 IST

मजुरांची कमतरता व मजुरीचे चढते दर लक्षात घेता पाहुणे म्हणून आलेल्या मंडळींसह शाळकरी विद्यार्थी शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे.

शिरपूर : तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. असे असतानाही मजुरांची कमतरता व मजुरीचे चढते दर लक्षात घेता पाहुणे म्हणून आलेल्या मंडळींसह शाळकरी विद्यार्थी शेतात कापूस वेचणीसाठी जात असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बहुतांश शाळा ओस पडल्याचे चित्र जाणवत आहे.गेल्या महिन्यापासून सर्वत्र कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. तालुक्यात अतवृष्टीने यावर्षी मोठय़ा प्रमाणावर कापूस पिकाला फटका बसला आहे. तशातच कापसाचे उत्पन्न समाधानकारक नाही. या पिकावरच शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन असते. कापसाची कमी आवक लक्षात घेता मजुरी देणेही शेतकर्‍यांना परवडत नसल्याने माहेरी आलेल्या मुली शेतावर जाऊन कापूस वेचत आहेत. तसेच त्यांच्या समवेत त्यांची मुलेही त्यांना मदत करीत आहेत.शाळेची पटसंख्या घटलीशिरपूर तालुक्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या १९ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १ हजारापर्यंत विद्यार्थी, तर ७३ माध्यमिक शाळेमधील पटसंख्या २२ हजारांपर्यंत एकंदरीत या शाळेतील ४0 ते ४५ टक्केच्यावर विद्यार्थी कापूस वेचणीला शेतात जाताना दिसत असल्यामुळे बहुतांश शाळेतील पटसंख्या कमी झालेली आहे. दुपारनंतर अन्य विद्यार्थ्यांची दांडीग्रामीण भागातील शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी कापूस वेचणीला जात असल्यामुळे बोटावर मोजण्याएवढेच विद्यार्थी शाळेत येत आहे, तेही मधल्या सुट्टीनंतर गायब होत असल्याचे चित्र आहे. कापूस वेचून प्रत्येक विद्यार्थी किमान १00 ते ३00 रुपयांपर्यंत मजुरी मिळवत आहे. मुलांना दिवाळीची सुटी लागल्यापासून ते कापूस वेचणीला जात आहे. पैसा मिळत असल्यामुळे त्यांनी शाळेला दांडी मारल्याचीही चर्चा आहे. दिवाळीनंतर शाळा उघडूनसुद्धा मुले अद्यापही कापूस वेचणी करीत आहेत. साधारणत: डिसेंबर अखेरपर्यंत विद्यार्थ्यांची कापूस वेचणीमुळे शाळेला दांडी असेल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे डिसेंबरनंतरच शाळा पुन्हा गर्दीने फुलणार असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.

------------

कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी शेतमालाला भाव नाही. अशा दुष्टचक्रात बळीराजा सापडला आहे. शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहात होते. मात्र, आता कापूस लागवडीसाठी लागणारा खर्च, मजुरी पाहता मिळणारा भाव अत्यल्प असल्यामुळे शेतकर्‍यांना कापूस पीक परवडेनासे झाले आहे.