सामनेर ता. पाचोरा : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ग्रामसभेत विविध समस्यांनी त्रस्त झालेल्या महिलांनी ग्रामसेवकास साडी व बांगडय़ांचा आहेर दिला. ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}गावात 14 व्या वित्त आयोगाचे एकही काम झाले नाही. दलित वस्तीत काम झालेले नाही. बेरोजगारांना मुद्रा लोनसाठी लागणारे कागदपत्र देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. घरपट्टी-पाणीपट्टी भरुनही वेळेवर त्यांना कागदपत्रे दिली जात नाही. विविध दाखल्यांसाठी दोन-दोन महिने भटकंती करावी लागते. काही ग्रा.पं. सदस्यांनी घरपट्टी-पाणीपट्टी भरली नसतानाही त्यांना निरंकचा दाखला दिला जात असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. यावेळी सरपंच कविता साळुंखे, उपसरपंच प्रवीण पाटील, ग्रा.पं. सदस्य, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)