शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

२६ नागरिकांना घरी जावून ‘रोटरी’तर्फे वैद्यकीय सेवा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:10 IST

जळगाव : जनता कर्फ्यूमध्ये आपत्कालीन स्थितीत रोटरी ईस्टच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती़ रविवारी सकाळी ...

जळगाव : जनता कर्फ्यूमध्ये आपत्कालीन स्थितीत रोटरी ईस्टच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती़ रविवारी सकाळी साडेसहा वाजेपासून २० डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली होती़ वीस नामांकित डॉक्टांराची टीम कार्यरत होती़ या डॉक्टरांनी शहर आणि परिसरातील २३ किमी परिसर व्यापून २६ नागरिकांच्या घरी जावून तपासणी केली़ यातील १३ नागरिकांना घरीच औषधोपचार करण्यात आले. सहा रूग्णांना रूग्णवाहिकेतून काही खासगी तर काही शासकीय रूग्णालयात हलविले़यात रोटरी ईस्टचे अध्यक्ष डॉ़ विनोद भोईटे पाटील, सचिव विरेंद्र छाबडा यांच्यासह डॉ़ जगमोहन छाबडा, डॉ़ निलेश चांडक, डॉ़ राहुल बन्साली, डॉ. मयुरी पवार, डॉ़ अमित पवार, डॉ़ अमय कोतकर, डॉ़ मूर्तजा अमरेलीवाल, डॉ़ मंदार पंडित, डॉ़ स्वप्निल चौधरी, गौरव महाजन, श्रीधर पाटील, सचिन खडके, भावेश शहा, संजय गांधी हे कार्यरत होते़ यात जीएम फाऊंडेशनचे अरविंद देशमुख, होनाजी चव्हाण यांनी सहकार्य केले़-सर्व दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावर सेवा बजाविणाऱ्या अनेकांसाठी अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे मोफत चहाची व्यवस्था करण्यात आली होती़ तरूणांनी दुचाकीवर फिरून चौका-चौकात असलेले पोलीस तसेच गोरगरिब नागरिकांना चहा वाटप केले. ट्रस्टचे देव सचदेव, रिंकेश मकडीया, सावल अडवाणी, मुकेश मंधान, मुकेश नथाणी, अशोक मेहता, पवन मोतीरामाणी यांनी चहा वाटप केले.-भिक मागणाऱ्यांचीही गैरसोय होवू नये, यासाठी भूषण हंसकर या तरूणाकडूनही भिक मागणाºया वृध्द तसेच बालक आणि महिलांना बिस्किटचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव