शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर टाकलेल्या गाण्यावरून दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 20:12 IST

रावेर तालुक्यातील रसलपूरची घटना : ११ जणांना अटक

रावेर : तालूक्यातील रसलपूर येथील गजेंद्र काशिनाथ शहाणे याने सोशेल मिडियावर धार्मिक भावना दुखावणारे गाणे टाकल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होवून त्यास अटक व सुटका झाल्यानंतर सायंकाळी शेख नुरा शेख कलाम याच्यासह १५ जणांच्या जमावाने शहाणे याच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात घराच्या खिडक्या व दरवाजे तोडून घरात असलेल्या त्याच्या पत्नीचा विनयभंग केला. गुरूवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी शुक्रवारी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ११ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण होऊन मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.सदर पिडीत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन व मंगळसूत्र ओढाताणीत तोडून, सर्वांना घराबाहेर काढून जिवंत जाळून मारून टाका.. चिनावलचा इरफान शेठ सर्व काही पाहून घेईन.. भिऊ नका.. अशी धमकी व चिथावणी देवून घरावर दगडफेक केल्याचा प्रकार रसलपूर गावात घडला. दरम्यान, फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व रावेर पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी रावेर पोलिसांची कुमक, शीघ्र कृती दलाची तुकडी, दंगा नियंत्रण पथकाची एक तुकडी वेळीच घटनास्थळी पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवून दाखल गुन्ह्यातील ११ आरोपींना अटक केली आहे.या संदर्भात सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रसलपूर येथील गजेंद्र काशिनाथ शहाणे यांनी सोशल मिडियावर धार्मिक भावना दुखावतील अशा गाण्याची आॅडियो क्लिप व्हायरल केल्याने, चिनावल येथील इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात आरोपीला गुरूवारी रात्री अटक करून रावेर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याची पोलिसांनी सुटका केली होती.घरी परतल्यावर आला जमावशहाणे हे सायंकाळी घरी परतल्यानंतर शेख नुरा शेख कलाम याने त्याचे साथीदाराहसह शहाणे याच्या घरावर हल्ला चढविला. शेख नुरा शेख कलाम याने त्याचे साथीदारांसह गजेंद्र शहाणे यांच्या घरात धुडघूस करताना धमक्या देत त्यांच्या पत्नीचा विनयभंग करत सोन्याची चेनही ओढून नेली असे तक्रारीत म्हटले आहे. तसेच तेथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचीही जमावाने तोडफोड केली. ८ रोजी सायंकाळी ही घटना घडली. घटनेची माहिती समजताच फैजपूर पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दंगा नियंत्रण पथक व शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्या पाचारण करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. यासंबंधी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील ११ आरोपींना अटक करण्यात आली असून रसलपूर गावात तणावपूर्ण शांतता आहे.