शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड घाटात रस्त्यालगत संरक्षक भिंतींची डागडुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST

चाळीसगाव : कन्नड घाटरस्त्यालगत अपघात टाळण्यासाठी संरक्षक भिंतीसह शहरातील धुळे रोडवरील महाविद्यालयासमोर असणारे खड्डेही नुकतेच बुजविण्यात आले. ही मोहीम ...

चाळीसगाव : कन्नड घाटरस्त्यालगत अपघात टाळण्यासाठी संरक्षक भिंतीसह शहरातील धुळे रोडवरील महाविद्यालयासमोर असणारे खड्डेही नुकतेच बुजविण्यात आले. ही मोहीम चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी राबवली.

महाविद्यालयासमोर मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांसाठी समस्या निर्माण झाली होती. हे खड्डे बुजविल्याने पादचारी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कन्नड घाटात रस्त्यालगत बहुतांशी संरक्षक भिंतींची पडझड झाली होती. या संरक्षक भिंतींमुळे वाहने दरीत कोसळण्यापासून बचावतात. याच भिंतींची गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ठिकठिकाणी डागडुजी करण्यात आली. यासाठी अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी वैयक्तिक लक्ष घालून ही मोहीम राबवली.

धुळे रोडवरील रेल्वे पुलावर चाळीसगाव महाविद्यालयासमोर मोठे खड्डे पडले होते. गेल्या काही महिन्यांपासून ही समस्या वाहनचालकांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत होती. खड्डे मोठे असल्याने दरदिवशी अपघातही होत होते. येथेही गोरे यांनी लक्ष घालून हे खड्डे बुजविले. यामुळे हा रस्ता आता वाहनचालकांसाठी सोयीचा झाला आहे. पारोळा रोडवरही दिशादर्शक व आवश्यक सूचना देणारे फलकही नुकतेच लावण्यात आले आहे. नागरिक व वाहनधारकांच्या सोयीसाठी ही मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती सचिन गोरे यांनी दिली. वाहतूक नियमांचे पालन करून नागरिकांनी वाहने चालवावीत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

060721\06jal_6_06072021_12.jpg

कन्नड घाटात रस्त्यालगत संरक्षक भिती