शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सर्व बाजारपेठेतील भाजीपाला विक्रेत्यांना हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील सर्व बाजारपेठ परिसरासह उपनगरांमध्ये भरणाऱ्या बाजारांमधील विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहरातील सर्व बाजारपेठ परिसरासह उपनगरांमध्ये भरणाऱ्या बाजारांमधील विक्रेत्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. दुपारी ४ वाजेनंतर मनपाचा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने वेगवेगळ्या भागात एकाच वेळी कारवाया केल्या. यामध्ये १०० हून अधिक विक्रेत्यांचा माल देखील जप्त करण्यात आला आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात महापालिकेच्या पथकाकडून नियमित पाहणी होत असल्याने या भागात व्यवसाय करण्यासाठी अनेक भाजीपाला विक्रेते दचकतात मात्र गणेश कॉलनी चौक, बजरंग बोगदा परिसर, मास्टर कॉलनी, काशीबाई उखाजी कोल्हे शाळा परिसर या भागात अनेक भाजीपाला विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटत लहान बाजारच भरवले आहेत. याबाबत अनेक नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी मुख्य बाजारपेठ परिसर व्यतिरिक्त शहरातील उपनगरांमध्ये भरणाऱ्या या बाजारांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. काशीबाई उखाजी शाळा परिसरात ५० ते ६० विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत मनपाच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर या भागात जाऊन भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यासह अनेक विक्रेत्यांना समज देखील देण्यात आली.

महापालिकेकडून वीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती

महापालिकेच्या पथकाकडून शहरात दररोज कारवाई मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर देखील शहरातील अनेक भागांमध्ये भाजीपाला विक्रीसह इतर विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच या बाजारांमध्ये सोशल डिस्टंसिंग चे पालन देखील होत नसल्याने कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने पसरत आहे. त्यातच मुस्लिम बांधवांचा रमजान महिना देखील सुरू झाल्यामुळे बाजारात दुकाने बंद असतानाही खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी देखील होत आहे. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी व लपून-छपून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन विभागात २० अतिरिक्त कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून देखील वर्ग दोनच्या अधिकाऱ्याची नियुक्ती यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.