शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर, ऑक्सिजनचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:16 IST

समता सैनिक दलाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या जिल्ह्यात रेमडेसिविर व ऑक्सिजनचा तुटवडा भासत ...

समता सैनिक दलाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या जिल्ह्यात रेमडेसिविर व ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. परिणामी, अनेक बाधितांची प्रकृती ही चिंताजनक झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर रेमडेसिविर व ऑक्सिजनचा रुग्णालयांना पुरवठा करण्‍यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे. दरम्यान, तीन दिवसात पुरवठा सुरळीत न झाल्यास २३ एप्रिल रोजी आंदोलन करण्‍यात येईल, असाही इशारा देण्‍यात आला आहे.

सद्यस्थितीला बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर उपलब्ध होत नाही. दोनशे, पाचशे रुपये अधिक देऊन रेमडेसिविर उपलब्ध होत होते. पण, आता काही जण पंधरा ते वीस हजार रुपयात ते विक्री करीत आहेत. रेमडेसिविर व ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जिल्ह्यातील डॉक्टर व मेडिकलधारक हवालदिल झाले आहे. दुसरीकडे त्यांच्याबाबत सर्वसामान्यांमध्‍ये असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे तीन दिवसात ज्या रुग्णालयांना रेमडेसिविर व ऑक्सिजनची आवश्यकता आहे. तेथे तत्काळ पुरवठा करण्‍यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्‍यात आली आहे. पुरवठा सुरळीत न झाल्यास २३ एप्रिल रोजी समता सैनिक दलाच्यावतीने आंदोलन करण्‍यात येईल, असा इशारा जिल्हाध्‍यक्ष विजय निकम, जिल्हा उपाध्‍यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा सचिव भाईदास गोलाईत, जिल्हा कोषाध्‍यक्ष सचिन शिरसाठ यांनी दिला आहे.