माजी ग्रामपंचात सदस्याने केली निवृत्त शिपायाची हत्या; सततच्या भांडणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:27 IST2025-09-02T15:15:57+5:302025-09-02T15:27:46+5:30

जळगावात वृद्ध पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी अटक केली.

Raver wife killed her husband by hitting him in the head with an axe | माजी ग्रामपंचात सदस्याने केली निवृत्त शिपायाची हत्या; सततच्या भांडणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

माजी ग्रामपंचात सदस्याने केली निवृत्त शिपायाची हत्या; सततच्या भांडणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

Jalgaon Crime:जळगावातील रावेरमध्ये पत्नीने वृद्ध पतीचा निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली. रावेरच्या विवरा रोडवरील गणेश कॉलनी परिसरात शनिवारी रात्री १०:३० च्या सुमारास घरगुती वादातून पत्नीनेच पतीच्या डोक्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीने वार करून त्याची निघृण हत्या केली. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

हत्या झालेल्या व्यक्तीचे हुसेन रसूल तडवी (६५) असून, ते न्यू इंग्लिश स्कूल, निंभोरा येथील सेवानिवृत्त शिपाई होते. त्यांची पत्नी हुजराबाई हुसेन तडवी (६०) या माजी ग्रामपंचायत सदस्या आहेत. सततचे भांडण आणि घरात चालणाऱ्या वादाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस नाईक अविनाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरात पती हुसेन तडवी झोपलेले असताना पतीवर पत्नीने हुजराबाईने कुन्हाडीने वार करत हत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हुसेन तडवी यांचा मृतदेह रविवारी सकाळी रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यानंतर हुसेन तडवी यांचा अंत्यविधी मूळगावी कुंभारखेडा येथे पार पडला. याप्रकरणी निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पित्याची हत्या करणाऱ्या मुलाला अटक

अमळनेरमध्ये दोन दिवसांपूर्वी मुलाने पित्याच्या डोक्यात लोखंडी हातोडीने प्रहार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी आरोपी मुलास अटक झाली आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती समोर आलं. मृताचे नाव राजेंद्र दत्तात्रय रासने (६५), तर आरोपीचे नाव भूषण राजेंद्र रासने (३६) असे आहे. रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान भूषणने वडील राजेंद्र यांना खर्चासाठी पैसे मागितले होते. ते न दिल्याने झालेल्या वादातून आरोपीने दारूच्या नशेत वडिलांचा खून केला. 

राजेंद्र रासने गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेली हातोडी जप्त केली. आरोपी भूषण रासने याला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली आहे. 

Web Title: Raver wife killed her husband by hitting him in the head with an axe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.