शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

रावेरला १२ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 18:41 IST

पोलिसांची कारवाई, कोरोना संदर्भातील नियम न पाळणाऱ्यांवर  नजर  

रावेर :  शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे हातगाडी लावून फळे, भाजीपाला, बेकरी उत्पादनाच्या वस्तू विक्री करताना रहदारीत अडथळा निर्माण करणार्‍या १२ विक्रेत्यांविरूध्द  पोलीस पथकाने धडक कारवाई करून रावेर पोलिसात खटले दाखल केले असून, त्यांना रावेर न्यायालयासमोर हजर राहण्याची समज दिली आहे.      रावेर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी फौजदार मनोहर जाधव, पोहेकॉ. गोपाळ पाटील, पो. ना. महेंद्र सुरवाडे, पो. कॉ. रुपेश तोडकर, योगेश सावळे, सुकेश तडवी,  कुणाल सोनवणे, होमगार्ड कांतीलाल तायडे, राहुल जाधव यांच्या पथकाने  रस्त्याच्या कडेला हातगाडी  लावून फळे, भाजीपाला, पाव बिस्कीट वा खारी टोस्ट विक्री करून रहदारीत अडथळा निर्माण करताना शेख फारुख शेख कद्रुद्दीन, सुनील रघुनाथ शिरतुरे, गौतम गोविंदा बाविस्कर, इस्माईल खान मारेखान, शेख कलीम शेख कादर, शेख नाजिम शेख रशीद, शेख वसीम शेख रशीद, मोहम्मद शाकीर मोहम्मद साबीर, प्रदीप लक्ष्मीचंद गेरा, निवृत्ती तुकाराम पाटील,  गोपाळ अशोक भोई, विशाल राजकुमार पारवाणी हे आढळून आले. त्यांचे हातकाटे व वजनमापे जप्त करून त्यांना तातडीने घटनास्थळावरून हाकलून लावत  महाराष्ट्र पोलीस  अधिनियम १९५१चे कलम १०२ /११७ प्रमाणे रावेर पोलीस स्थानकात खटले दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांना कोर्टात हजर राहण्याची लेखी समज दिली असून, वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, अन्यथा संबंधीत हातगाडीवाल्यांवर व रस्त्यावर विक्री करणार्‍यांविरूध्द मुबई पोलीस कायदाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे.