शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव हरेश्वर येथे सोमवारी रथोत्सव

By admin | Updated: April 8, 2017 12:34 IST

300 वर्षाची परंपरा असलेल्या येथील श्रीराम रथोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून 10 रोजी हा रथोत्सव साजरा होणार आहे.

पिंपळगाव हरेश्वर, जि. जळगाव, दि. 8-  300 वर्षाची परंपरा असलेल्या येथील श्रीराम रथोत्सवाची  जय्यत तयारी सुरू असून 10 रोजी हा रथोत्सव साजरा होणार आहे. श्रीसमर्थ गोविंद महाराज यांनी 1795मध्ये पिंपळगाव येथे या रथोत्सवाची सुरुवात केली. आजही ही परंपरा कायम असून विठ्ठलमंदिरापासून रथोत्सवास प्रारंभ होतो.  त्यासाठी आदल्या दिवसापासून रथ सजविण्याचे काम सुरू होते.  रथाचे समोरील बाजूस दोन पांढरेशुभ्र लाकडी अश्वे असतात आणि सारथी म्हणून अजुर्नाची मूर्ती असते. रथामध्ये राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. गोविंद महाराजांचे सातवे वंशज ह. भ. प. शिवानंद महाराज व अंजलीबाई देवदेवतांची पूजा व आरती करतात त्यानंतर महाराज व ग्रामस्थ गावातील मुख्य रस्त्याने रथ ओढतात. रथाला मोगरी लावण्याचे काम भागवत गिते तर रथाची साफसफाई व अबदेगिरी गोविंदसिंग सरदारसिंग व परिवार करीत असतो.  आरती व प्रसाद करण्याची जबाबदारी मनोज साखरे यांच्यावर असते आणि सुरेश कोळी, पंडित बोढरे हेदेखील विविध जबाबदारी संभाळतात. रथ विठ्ठलमंदिराजवळ आल्यानंतर रेवडय़ांचा प्रसाद उधळला जातो. पूजा आरतीकरून कार्यक्रमाची सांगता होते.