शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आता रेल्वे तिकीट निरीक्षक सीट नाकारू शकत नाहीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:41 IST

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता प्रवासी आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन) संकेतस्थळावर आरक्षण चार्ट आॅनलाइन पाहू शकतात. तुम्हाला कळेल की प्रवासीगाडीमध्ये किती जागा शिल्लक आहे हे तुम्हाला आधीच कळू शकते.

ठळक मुद्देरेल्वे प्रवाशांसाठी सोयी-सुविधा संकेत स्थळावर रिक्त बर्थची मिळेल माहिती

भुसावळ, जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता प्रवासी आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन) संकेतस्थळावर आरक्षण चार्ट आॅनलाइन पाहू शकतात. तुम्हाला कळेल की प्रवासीगाडीमध्ये किती जागा शिल्लक आहे हे तुम्हाला आधीच कळू शकते. तुम्ही आरसीटीसीच्या वेबसाइटवर कुठल्याही गाडीचा रिझर्व्हेशन चार्ट पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला रेल्वे तिकीट निरीक्षकांकडे जाऊन विनंती करायची गरज नाही.रिझर्व्हेशन चार्ट तपासू शकताआरक्षण चार्ट तयार झाला की रेल्वे आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर तो अपलोड होतो. गाडी सुटण्याच्या ४ तास आधी साइटवर तो चार्ट दिसू शकतो. दुसरा चार्ट गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधी दिसू शकतो. दुसऱ्या चार्टमध्ये पहिल्या चार्टमधील रिकाम्या सीट्सची माहिती मिळते.अशी चेक करा सीटरिझर्व्हेशन चार्ट पाहण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या साइटवर जावं लागेल. या वेबसाइटवर बूक विंडोच्या खाली पीएनआर स्टेट्सच्या शेजारी व्हेकन्सीचा पर्याय मिळेल. यावर क्लिक करा, मग नवा विंडो येईल.यात तुम्हाला प्रवासाबद्दल माहिती मिळेल. यात तुम्हाला गाडीचे नाव, नंबर, प्रवासाची तारीख आणि बोर्डिंग स्टेशनची माहिती असते. मग तुम्हाला गेट ट्रेन चार्टवर क्लिक करावे लागेल. यावर क्लिक केल्यावर समोर एक विंडो उघडेल. या विंडोत सीटची श्रेणी होईल. म्हणजे स्लीपर, सेकंड सीटिंग, थर्ड एसी, सेकंड एसी. तुम्हाला ज्या क्लासमध्ये प्रवास करायचाय त्यावर क्लिक करावं लागेल. कुठल्या स्टेशनपासून कुठल्या स्टेशनपर्यंत बर्थ मोकळा आहे हे समोर येईल. कुठल्या कोचमध्ये कुठला बर्थ रिकामा आहे, हेही कळेल.विंडोच्या खाली शेड्युल येईल. त्यावर क्लिक करा. ट्रेनचे पूर्ण श्येड्यूल समोर येईल. ट्रेन उशिरा आहे का हेही कळेल. हेही कळेल की कुठल्या स्टेशनवर सीट रिकामी मिळेल.हे करा- चार्टमध्ये रिकामी सीट पाहून ती देण्यासाठी तुम्ही तिकीट निरीक्षकाला (टीटीआय) ला सांगू शकता. नवा चार्ट मोबाइलवरही पाहू शकता. तो डेस्कटॉपवरही दिसेल. सीट पाहण्यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर लॉगइन करावे लागणार नाही. कुणीही हा चार्ट पाहू शकतो. माहिती यामुळे आता प्रवासादरम्यान वेटिंग तिकीट असताना चार्टवरचे अपडेट माहिती आपल्याला या वेबसाईटद्वारे मिळत राहील.

टॅग्स :railwayरेल्वेBhusawalभुसावळ