गिफ्ट कथासंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:19 IST2021-09-26T04:19:45+5:302021-09-26T04:19:45+5:30

जळगाव : लेखक दीपक तांबोळी यांच्या गिफ्ट या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच जळगाव आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी अनिरुद्ध कांबळे ...

Publication of Gift Collection | गिफ्ट कथासंग्रहाचे प्रकाशन

गिफ्ट कथासंग्रहाचे प्रकाशन

जळगाव : लेखक दीपक तांबोळी यांच्या गिफ्ट या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच जळगाव आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमळनेर येथील हृदयरोग तज्ज्ञ आणि मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मिलिंद बागुल, कवी रमेश पवार, विजय लुल्हे, युवराज माळी, डॉ. प्रदीप सुरवाडकर, दीपक महाले उपस्थित होते. यावेळी अनिरुद्ध कांबळे आणि दीपक तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले, तर गिरीष चौगावकर सूत्रसंचालन केले. शरद महाजन यांनी आभार मानले. यावेळी संगीता माळी, रागिणी तांबोळी, प्रतीक तांबोळी, उत्कर्ष तांबोळी, दीपक साळुंखे यांनी स्वागत केले.

फोटो - गिफ्ट या कथासंग्रहाचे प्रकाशन करताना अनिरुद्ध कांबळे, दीपक तांबोळी, मिलिंद बागुल, रमेश पवार, संगीता माळी, युवराज माळी आणि इतर.

Web Title: Publication of Gift Collection