शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी जबरदस्ती करणाऱ्या मजनूला ‘पब्लिक मार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:32 IST

पोलिसांमुळे टळली मोठी दुर्घटना; गुन्हा दाखल

जळगाव : एकतर्फी प्रेमातून सतत तरुणीचा पाठलाग व जबरदस्ती करणाºया शब्बीर शहा भुरुशहा (२४, रा. फकिरवाडा, म्हसावद, ता. जळगाव) याची तरुणीचे नातेवाईक व बसमधील प्रवाशांनी चांगलाची धुलाई केली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी एस.टी.बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता इच्छादेवी चौकाजवळ ही घटना घडली. शब्बीर याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील २१ वर्षीय तरुणी नूतन मराठा महाविद्यालयात रोज एस.टी.बसने शिक्षणासाठी येते. शब्बीर शहा भुरुशहा हा या तरुणीला ओळखतो, त्यातून तो गेल्या काही दिवसापासून तिचा पाठलाग करीत आहेत. तरुणीच्या वडीलांचे त्या गावात दुकान असून त्या दुकानावर येताना व जाताना शब्बीर हा तिला तु कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेते, मी तुझ्यावर प्रेम करतो यासह आणखी अश्लिल शब्दप्रयोग करीत होता. या प्रकाराला कंटाळलेल्या तरुणीने पालकांना हा प्रकार सांगितला असता त्यांनी शब्बीर याच्या कुटुंबाला सांगण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे तरुणी गप्प बसली होती.कुटुंब सोबत असतानाही अश्लिल हावभावपीडित तरुणी व तिची बहिण मंगळवारी महाविद्यालयात आली होती. जळगाव-एरंडोल बसने घरी जाताना याच बसमध्ये असलेला शब्बीर पीडितेच्या बहिणीजवळ बसला आणि एकटक तिच्याकडे बघत राहिला.त्यामुळे ही तरुणी त्या सीटवरुन उठून बहिणीजवळ बसली. तेव्हाही तो अश्लिल हावभाव करायला लागला. बस तांबापुराजवळ आल्यावर तरुणीने त्याला जाब विचारला असता, तु गावात चल, तुला बघतो म्हणून परत धमकी दिली. या प्रकारामुळे पीडित तरुणीने शहरात राहणाºया मावस भावाला बोलावून घेतले. त्यानंतर त्याला तेथे चोपण्यात आले.यावेळी त्याची आई व भाऊ देखील बसमध्ये होते.संभाव्य घटनेचा अंदाज अन् पोलिसाची तत्परता...संशयिताच्या मुसक्या आवळल्यातरुणीच्या छेडखानीमुळे शब्बीर याला पब्लीक मार पडत असल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच वेळी पाचोरा येथे शिवजयंती बंदोबस्ताला जात असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे रामकृष्ण पाटील व शरद भालेराव हे तेथे थांबले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता रामकृष्ण पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व मनोज सुरवाडे यांना घटनेची माहिती देवून तात्काळ अतिरिक्त कुमक मागवून घेतली. त्यावेळेत इकडे पाटील व भालेराव यांनी नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन करुन शब्बीर याचा मार वाचविला. उपनिरीक्षक गणेश कोळी, आनंदसिंग पाटील, नितीन पाटील व लुकमान तडवी यांनी बसचा ताबा घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणली. तेथेही प्रवाशी शब्बीर याच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्यान, पीडित तरुणीच्या फिर्यादीवरुन शब्बीर याच्याविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन व निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी पीडितेकडून घटनाक्रम जाणून घेतला.

टॅग्स :Jalgaonजळगाव