शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

598 संस्थांचा निवडणूक खर्च महिनाभरात सादर करा

By admin | Updated: April 8, 2017 13:26 IST

हा खर्च कोणत्याही परिस्थितीत येत्या महिनाभरात सादर करावा अशी तंबी तालुका उपनिबंधक व निवडणूक अधिका:यांना दिली.

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांची तंबी : उपनिबंधकांसह निवडणूक अधिका:यांसोबत बैठक जळगाव : अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका आटोपल्या मात्र बराच कालावधी लोटला तरी निवडणूक खर्चाचा तपशिल सादर न केल्याने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त मधुकर चौधरी यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत येत्या महिनाभरात सादर करावा अशी तंबी तालुका उपनिबंधक व निवडणूक अधिका:यांना दिली.जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या. झालेल्या निवडणुकांच्या काळातील खर्चाच्या तपशिलांचा आढावा घेण्यासाठी मधुकर चौधरी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले होते. यावेळी सर्वच तालुक्यांच्या सहनिबंधक व निवडणुकांशी संबंधित अधिका:यांना बोलविण्यात आले होते. प्रारंभी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांचा आढावा सादर केला. 1639 संस्थांच्या निवडणुकाजिल्ह्यात गेल्या वर्षभरात 1339 सहकारी संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. पैकी 994 सहकारी संस्थांसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिका:यांनी निवडणुकीत झालेल्या खर्चाचा हिशोब सादर केला आहे. तर 598 सहकारी संस्थांच्या निवडणुका होऊन बराच कालावधी लोटला तरी निवडणूक निर्णय अधिका:यांनी झालेल्या खर्चाचा हिशोब अद्याप सादर केलेला नाही. अधिका:यांना तंबीहिशोब सादर न करण्यात येणा:या अडचणींची माहितीही मधुकर चौधरी यांनी यावेळी घेऊन मार्गदर्शन केले. यानंतर आता येत्या महिनाभरात हिशोब जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केला जावा असे आदेश यावेळी देण्यात आले. हिशोब सादर न करणा:या संस्था ब, क व ड वर्गवारीतील आहेत. यात जळगाव, अमळनेर, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, रावेर व यावल या तालुक्यांमधील संस्थांचा समावेश आहे. जळगावचे  पत्र राज्यभरातहिशोब सादर करण्यात राज्यात जळगाव जिल्ह्याची चांगली प्रगती आहे. हिशोब सादर करावेत म्हणून जिल्हा उपनिबंधक जाधवर यांनी तालुक्यांना  पत्र दिले होते. हिशोब सादर न केल्यास गुन्हे दाखल केले जातील अशा इशा:यांचे हे पत्र होते.  त्याचे परिणाम चांगले दिसून आल्याने, हे पत्र आता राज्यातील विविध जिल्ह्यांना दाखविले जाईल असे चौधरी यांनी सांगितले.