शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जळगांव, भुसावळ व पाचोरा विभागात वीज पुरवठा उद्या बंद राहणार

By admin | Updated: June 23, 2017 17:26 IST

महावितरणतर्फे तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामांना वेग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.23- जिल्ह्यातील जळगांव, भुसावळ व पाचोरा या विभागातील वीज पुरवठा तांत्रिक देखभाल व दुरुस्तीच्या कामाकरीता शनिवार 24 जून  रोजी दोन ते चार तास बंद राहणार असल्याचे महावितरण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
भुसावळ विभागातील 132 केव्ही पहूर उपकेंद्रातून निघणा:या 33/11 केव्ही तळेगाव, फत्तेपुर,शेंदुर्णी,नेरी,तोंडापुर व पिंपळगाव या सहा उपकेंद्रावरील वीजपुरवठा सकाळी 10 ते दुपारी 12 या दोन तासाकरीता बंद राहणार आहे. त्यात तळेगांव,आमखेडा, शहापुर, भाटी, सामरोड, फत्तेपुर शेती, वाकडी शेती, तोंडापुर शेती, गोद्री शेती तोंडापुर गावठाण, फत्तेपुर गावठाण, गोद्री गावठाण,देउळगाव, मेंगाव, शेंदुर्णी, बिलवाडी, मेंगाव गावठाण, नेरी, मोहाडी शेती, नेरी गावठाण, मोहाडी गावठाण, गाडेगांव शेती, चिंचखेडा, भारूडखेडा, भगदरा, सोनाला, टाकली या 11 केव्ही वाहिन्यांवरील वीजपुरवठा बंद राहील.
जळगांव विभागातील 220 केव्ही बांभोरी उपकेंद्रातून निघणा-या 33/11 केव्ही किनोद या उपकेंद्रावरील किनोद, फुपनगरी, देवगाव, अमोदे, जामोद, पळसोद, भोकर, भादली खुर्द, गाढोदे या भागातील वीजपुरवठा दुपारी 1.30 ते 4 या वेळेत बंद राहील. 33/11 केव्ही कानळदा या उपकेंद्रावरील कानळदा, आव्हाणे , खेडी, वडनगरी,नंदगाव,पिलखेडा, कुंवरखेडा, फुपनगरी, नांद्रा ,फेसर्डी या भागातील वीजपुरवठा दुपारी 4.00 ते 6.30 या वेळेत बंद राहील. 33 केव्ही शिवाजीनगर उपकेंद्रावरील  शिवाजीनगर, प्रजापतनगर, इंद्रप्रस्थनगर, गेंदालाल मिल, राजमालतीनगर, मिल्क फेडरेशन परिसर, महावीरनगर, दत्त कॉलनी, उस्मानिया पार्क, सत्यम पार्क, कानळदा रोड परिसर, रेल्वे कॉलनी, केसी पार्क, काळे नगर, भुरेमामलेदार परिसर, केजीएन पार्क, महम्मदीया नगर, लाकुडपेठ परिसर, उमर कॉलनी, त्रिभुवन कॉलनी, हरिओमनगर,आरवाय पार्क, फुपनगरी, घरकुल परिसर या भागातील वीजपुरवठा सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत बंद राहील.
पाचोरा विभागातील 132 केव्ही पारोळा या उपकेंद्रातून निघालेल्या 132 केव्ही अंमळनेर पारोळा बे-लाईनवरील 33 केव्ही पारोळा, तामसवाडी, सावखेडा, बद्रापूर, मंगरूळ व र}पिंप्री या सहा उपकेंद्रावरील वीजपुरवठा सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत बंद राहणार आहे.