शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
2
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
3
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
4
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
5
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
6
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
7
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
8
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
9
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
10
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
11
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
12
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
13
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
14
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
15
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
16
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
17
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
18
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
19
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
20
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली

पोलीस युवतीचा विनयभंग केल्याने युवकाचे घर पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 22:58 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी पोलीस कर्मचारी युवतीचा विनयभंग केल्याने युवकासह त्याच्या कुटुंबातील सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे

ठळक मुद्देचुंचाळे यथील घटना : दोन्ही कुटुंबांची एकमेकांविरुद्ध फिर्याद
लोकमत न्यूज नेटवर्कयावल/चुंचाळे : तालुक्यातील चुंचाळे येथील मूळ रहिवासी असलेल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी पोलीस कर्मचारी युवतीचा विनयभंग केल्याने युवकासह त्याच्या कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तर या घटनेमुळे युवकाचे घर जाळल्याची खळबळजनक घटना १८ रोजी घडली. याप्रकरणी युवतीच्या दोन नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे.या घटनेबाबत युवतीने दिलेल्या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चुंचाळे येथील शरद अशोक पटील या युवकाशी सन २०१४ पासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तेव्हापासून तो तिचा मोबाईल चेक करण्यासाठी वारंवार मागतो. १८ जानेवारी रोजी दीड-पावणे दोन वाजेच्या सुमारास युवती तिच्या शेतात आईचा डबा घेवून जात असताना रस्त्यात शरदने तिला अडवून तिच्याशी अंगलट करीत जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी युवकासह कुटुंबातील स्वप्नील पाटील तसेच महिला अशा एकूण सातजणांविरूध्द जातीवाचक शिवीगाळ करणे, विनयभंग करणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैजपुर उपविभागीय पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पिंगळे, हे. कॉ. संजय तायडे तपास करीत आहेत.याचबरोबर युवकाच्या आजीने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, सदर पोलीस युवतीशी नातू शरद पाटील याचे प्रेमसबंध आहेत. सोमवारी नातीचे लग्ननात पंगती सुरू असतांना नातवाशी मुलीच्या कुटूंबियाशी झालेल्या वादामुळे युवतीचे वडील, भाऊ यांनी शिवीगाळ करीत इतरांसह घरात घुसत साहित्यावर पेट्रोल टाकून आग लावली. यामुळे घरातील सुमारे तीन लाख रुपयाचे साहित्य जळाले आहे. यातील युवतीच्या वडील आणि भावास अटक केली असून न्यायालयातन्हजर केले असता २५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे.पो. नि. सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार जितेंद्र खैरनार पुढील तपास करीत आहेत.
टॅग्स :JalgaonजळगावYawalयावलRatnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी