शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

गस्तीवरील पोलिसांवर मोटारसायकलस्वारांनी झाडल्या ठासणीच्या बंदुकीतून दोन फैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 10:29 PM

पोलिसांनी रस्त्याने पालकडून येत असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील दोन जणांनी ठासणीच्या बंदुकीतून गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडून पोबारा केला.

ठळक मुद्देरावेर : पाल रस्त्यावरील पहाटेची घटना; थांबविले होते चौकशीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क

रावेर, जि. जळगाव : रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी रस्त्याने पालकडून येत असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील दोन जणांनी ठासणीच्या बंदुकीतून गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडून पोबारा केला.  पाल-रावेर रस्त्यावर सहस्रलिंग गावालगतच्या एका ढाब्याजवळ मंगळवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रावेर पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत रावेर पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सातपुड्याच्या अतिदुर्गम डोंगरदऱ्यातून जाणाऱ्या रावेर-पाल रस्त्यावर रावेर पोलीस  स्टेशनच्या कॅमेरा वाहनातून पोकॉ श्रीराम कंगणे, गृहरक्षक तालुका  समादेशक कांतीलाल तायडे, सुनील तडवी, अमित समर्थ हे गस्त घालत शेरीनाका मध्यप्रदेश सीमेवरील आंतरराज्यीय  नाकाबंदीला भेट देत रावेरकडे परतीच्या मार्गाने प्रयाण केले.दरम्यान, सहस्रलिंग गावालगतच्या वळण रस्त्यावरील एका ढाब्यावर चहापाणी मिळते काय, यासाठी वाहनाच्या खाली उतरून पोकॉ कांगणे व त्यांचे सहकारी चौकशी करीत असतानाच पालकडून दोन मोटारसायकलवर चार जण येत असल्याचे त्यांना दिसले. तथापि, रात्रीच्या संचारबंदीत संशयास्पद स्थितीत कोण फिरत आहे, यासंबंधी चौकशी करण्यासाठी त्यांनी मोटारसायकलस्वारांना हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दोन्ही मोटारसायकलवरील दोघेही बंदूकधारी युवकांनी रस्त्याच्या कडेला उभे असलेले पोलिसांचे वाहन व पोलिसांना रस्त्यात उभे असल्याचे पाहून पोलिसांना जिवे  मारण्याच्या उद्देशाने त्या युवकांनी ठासणीच्या बंदुकीतून पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने कोणालाही हानी झाली नाही.

संशयित आरोपींनी केलेल्या या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे विशेष. ही घटना  १० मे रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांवर झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींनी युटर्न  घेऊन पालकडे, तर दुसऱ्या मोटारसायकलवरील आरोपींनी सहस्रलिंगकडे पोबारा केल्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या हाती अपयश आले. अंदाजे विशी ते पंचविशीतील हे तरुण असण्याचा पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

या घटनेबाबत पाल आउटपोस्ट चौकीतून संदेश प्राप्त होताच अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, प्रभारी पोलीस निरीक्षक बशीर शेख,  सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर तपासचक्र गतिमान केले आहे.

शिकारीसाठी ‘ते’ जात असावेत

संशयित आरोपी ठासणीच्या बंदुका घेऊन शिकारीसाठी जात असताना त्यांना पोलीस वाहन व रस्त्यावर खाकी वस्त्र परिधान केलेले चार जवान उभे दिसल्याने कदाचित वन्यजीव वा वनविभागाचे कर्मचारी असल्याच्या संशयातून त्यांनी थेट जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन बंदुकीतून दोन फैरी झाडल्याचा अंदाज असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल श्रीराम कांगणे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत भादंवि कलम ३०७, ३५३, ३३७, आर्म ॲक्ट ३(२५) व ३४ अन्वये बंदुकीच्या दोन फैरी झाडून पोलिसांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, फैजपूर पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक पुढील तपास करीत आहेत.

बंदूक धावपळीत सोडून गेले

गस्तीवरील पोलिसांवर ठासणीच्या बंदुकीतून फैरी झाडणारे आरोपी पसार झाले असले तरी पसार होण्याच्या धावपळीत त्यांच्या हातातील ठासणीची बंदूक मात्र ते सोडून गेल्याने पोलिसांना तपासाचा धागादोरा त्यातून गवसतो का? हे पुढे कळेलच.

टॅग्स :JalgaonजळगावRaverरावेरFiringगोळीबारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी