शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी, सेनेला खाते उघडण्याची संधी

By admin | Updated: October 8, 2014 11:48 IST

अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कॉँग्रेस, जनता पक्ष, जनता दल व भाजप एवढेच नाही, तर अपक्षालाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे.

अतुल जोशी ■ अमळनेर
 
अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कॉँग्रेस, जनता पक्ष, जनता दल व भाजप एवढेच नाही, तर अपक्षालाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. या वेळी कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असून, राष्ट्रवादी व शिवसेनेला मतदारसंघात खाते उघडण्याची संधी मिळालेली आहे. या संधीचा फायदा हे दोघे पक्ष कितपत घेतात ते निकालानंतर समजेल. असे असले तरी या मतदारसंघावर पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप व कॉँग्रेसनेही कंबर कसलेली आहे.
१९५२ पासून २00९ पर्यंत १३ वेळा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. यात सर्वाधिक सहा वेळेस कॉँग्रेसने या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. त्याखालोखाल भाजपाने तीन वेळा, जनता पक्षाने दोन वेळा, जनता दल व अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक-एक वेळेस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भाजपाने मिळविले यश
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर या पक्षाने अमळनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा १९९0 मध्ये निवडणूक लढविली. सेनेतर्फे निवडणूक लढविणारे डी.एम. सुतार या गैरमराठा उमेदवाराने अन्य उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवित, तब्बल २0 हजारांपेक्षा अधिक मते घेतल्याचे सांगण्यात येते. यानंतर राज्यात भाजप-सेना युती झाल्याने, सेनेने हा मतदारसंघ भाजपाला सोडला. तेव्हापासून या मतदारसंघावर भगवा फडकला. मिळालेल्या संधीचे भाजपने सोने करीत, तीन वेळा मतदारसंघाचे एकाच उमेदवाराने प्रतिनिधित्व केले.
मे १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षातर्फे निवडणूक लढविण्यात आलेली नसली तरी त्यांनी अपक्षाला पाठिंबा दिला होता. २00४ व २00९ मध्ये आघाडी असल्याने, कॉँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीने सहकार्याचीच भूमिका बजावली.
आता २0१४च्या निवडणुकीत आघाडी नाही की युती नाही. भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे जनमत अजमावित आहेत. राष्ट्रवादी पक्ष पहिल्यांदाच आपल्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे आता खर्‍या अर्थाने या पक्षाला अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळालेली असून, त्याचे रूपांतर खाते उघडण्यात होईल का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवसेना स्वतंत्रपणे दुसर्‍यांदा निवडणुकीला सामोरे जात असून, सेना विजयाचे शिवधनुष्य उचलून खाते उघडणार का? याकडेही लक्ष लागले आहे. कॉँग्रेसला सातव्यांदा, तर भाजपाला हातचा गेलेला मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची संधी स्वतंत्र लढण्यामुळे मिळाली आहे. अपक्ष उमेदवाराचेही कडवे आव्हान आहे. त्यामुळे चुरशीच्या होणार्‍या लढतीत कोण बाजी मारणार ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.