मलेशियात असलेल्या तरुणीचा जळगावात ऑनलाईन घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 07:00 PM2020-08-13T19:00:19+5:302020-08-13T19:16:46+5:30

जिल्ह्यातील दुसरा निकाल : दोन महिनेच चालला संसार

Online divorce in Jalgaon of a young woman who is in Malaysia | मलेशियात असलेल्या तरुणीचा जळगावात ऑनलाईन घटस्फोट

मलेशियात असलेल्या तरुणीचा जळगावात ऑनलाईन घटस्फोट

Next
ठळक मुद्दे परदेशात असलेल्या व्यक्तीची ऑनलाईन हजेरी घेऊन घटस्फोट झाल्याचे हे दोन महिन्यातील जिल्ह्यातील दुसरे प्रकरण आहे. दोघांनी परस्पर संमतीने एक वर्षापूर्वी जळगावाच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रसार व लॉकडाऊन यामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने मलेशियात असलेल्या तरुणीचा गुरुवारी कौटुंबिक न्यायालयात मोबाईलवरच ऑनलाईन घटस्फोट झाला. परदेशात असलेल्या व्यक्तीची ऑनलाईन हजेरी घेऊन घटस्फोट झाल्याचे हे दोन महिन्यातील जिल्ह्यातील दुसरे प्रकरण आहे. यापूर्वी नागपूर, पुणे, नाशिक येथील न्यायालयांनीही असे निकाल दिलेले आहेत.


जळगावातील या दाव्यात पती जळगावात वास्तव्यास आहे आणि त्याची पत्नी नोकरीनिमित्त मलेशियात म्हणजे विदेशात वास्तव्यास आहे. २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले. सुरुवातीला दोन महिने दोघांचा संसार सुरळीत चालला. त्यानंतर संसारात विघ्ने आली, त्यामुळे पत्नी माहेरी पुणे येथे निघून गेली. तेथेच स्थायिक झाल्यानंतर काही दिवसांनी तिला मलेशियात नोकरी लागली. दोघांनी परस्पर संमतीने एक वर्षापूर्वी जळगावाच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.


कोरोना आजाराच्या साथीमुळे विमाने बंद असल्याने या पत्नीला अखेरच्या जबाबासाठी विमानाने भारतात येणे शक्य नव्हते म्हणून न्यायाधीशांनी हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने तिचा जबाब नोंदवून घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार गुरुवारी ही प्रक्रिया पार पडली. पत्नी मलेशियात तर पती न्यायालयात होता. अखेरचा जबाब नोंदवण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर हिंदू विवाह कायद्याच्या (१९५५) कलम १३ ( बी ) नुसार आपसातील संमतीने या घटस्फोटाचा निवाडा न्या.रितेश लिमकर यांनी जाहीर केला. या खटल्यात महिला वकील ज्योती भोळे यांनी कामकाज पाहिले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी 

 

Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी 

 

सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत

Web Title: Online divorce in Jalgaon of a young woman who is in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.