कट मारल्याच्या वादावरून एकाच्या मानेवर विळा मारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:12 IST2021-06-17T04:12:18+5:302021-06-17T04:12:18+5:30

अमळनेर : कट का मारला याचा जाब विचारल्यावरून दोघांनी एकाच्या मानेवर विळा मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. ...

One was stabbed in the neck over an argument over a cut | कट मारल्याच्या वादावरून एकाच्या मानेवर विळा मारला

कट मारल्याच्या वादावरून एकाच्या मानेवर विळा मारला

अमळनेर : कट का मारला याचा जाब विचारल्यावरून दोघांनी एकाच्या मानेवर विळा मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.

रोहिदास भिल व चंदू भिल, रा. दरेगाव, ता. अमळनेर हे दोघे १४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दरेगावला मोटारसायकलने जात असताना दरेगाव फाट्याजवळ राजेश जयवंत महाले उर्फ सोनल घोडेवाला याने त्यांना कट मारल्याने ते खाली पडले व त्यांना जखम झाली म्हणून त्यांनी तांबेपुरा येथील शहाबान पिंजारी याला सांगितल्याने त्याने गोलू खाटीकला पाठवून दोघांवर उपचार करून त्यांना रवाना केले. त्यानंतर गोलू व शहाबान हे दोघे सोनल घोडेवाल्याच्या घरी विचारपूस करायला गेले असता तिकडून सोनल व त्याचा मित्र रवींद्र उर्फ गंप्या रामभाऊ जाधव यांनी तुमच्याशी बोलायचे आहे असे सांगून प्रताप कॉलेजजवळील घोड्याच्या पत्र्याच्या शेडजवळ घेऊन गेले. तेथे कट मारल्याचा जाब विचारला असता गंप्या जाधव याने शहाबानच्या मानेवर डाव्या बाजूला चारा कापण्याचा विळा मारून गंभीर जखमी केले. शहाबानच्या मानेतून रक्त भळाभळा वाहू लागले तो जीव घेऊन पळाला. तेथून तो गोलूसोबत पोलीस स्टेशनला आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी डॉ. अनिल शिंदे यांच्याकडे दाखल केले. गुलाब पिंजारी यांच्या फिर्यादीवरून गंप्या व सोनल घोडेवालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एपीआय राकेशसिंग परदेशी करीत आहेत.

Web Title: One was stabbed in the neck over an argument over a cut