ऑलिम्पिक स्पर्धा जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST2021-07-30T04:16:15+5:302021-07-30T04:16:15+5:30

यावल : टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे दहा खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी व यावल ...

Olympic competition awakening | ऑलिम्पिक स्पर्धा जागरण

ऑलिम्पिक स्पर्धा जागरण

यावल : टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे दहा खेळाडू सहभागी होणार आहेत. या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी व यावल तालुक्यात तरुण युवकांना प्रेरणा मिळावी व खेळाचे वातावरण तयार होण्यासाठी ‘ऑलिम्पिक जागरण’ या उपक्रमाचा आज यावल पोलीस स्टेशन आवारात यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या हस्ते सेल्फी पॉईंट अभियानाचा शुभारंभ करण्यात. किनगाव इंग्लिश निवासी पब्लिक स्कूलचे सचिव मनीष विजयकुमार पाटील व प्रभारी गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांनी हवेत फुगे सोडून आंनद उत्सव साजरा केला. याप्रसंगी यावल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नईम शेख, मुलींचे विकास विद्यालय यावलच्या मुख्याध्यापिका निशा पाटील व कन्या विद्यालय यावलच्या मुख्याध्यापिका पुष्पा अहिरराव आदी उपस्थित होते. मनीष विजयकुमार पाटील यांनी या कार्यक्रमासाठी संपूर्ण मदत केली. सूत्रसंचालन यावल तालुका क्रीडा समन्वयक व मुख्याध्यापक के. यू.पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन वाय. जी. कोळी यांनी केले. निवासी पब्लिक स्कूलचे क्रीडाशिक्षक दिलीप बिहारी संगेले, एम. व्ही. ठाकूर, महेश पाटील व सुनील गावडे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Olympic competition awakening