शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा... एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी जाते दररोज वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळतीमुळे वाया जात आहे. एकीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळतीमुळे वाया जात आहे. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या हजारो लिटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मनपाकडून दरवर्षी ४० लाख रुपयांचा खर्च शहरातील पाइपलाइनच्या गळत्यांवर होत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठीही मनपाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, अमृतचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाया जाणाऱ्या पाण्याची काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.

शहरातील वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जुनी आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी लहान-मोठ्या गळत्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. वितरणादरम्यान सुमारे ४७ टक्के पाणी वाया जाते. याबाबतचा अहवाल सुजल निर्मल अभियानांतर्गत नेमलेल्या नागपूरच्या कंपनीने सादर केला होता. शहरातील अनेक गळत्या या काही वर्षांपासून जशाच्या तशा आहेत. त्या गळत्यांची किमान दुरुस्ती देखील मनपाकडून होत नाही.

शहरातील पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट

१० कोटी

पाणीपुरवठ्याचे वर्षाचे बिल

७ कोटी

पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी

३५०

लिकेजमुळे २० टक्के पाणी वाया

शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटर ७० मिलियन लिटर्स पाण्याची आवश्यकता जळगावकरांना लागते. शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणाहून ९६ एमएलडी पाणी दररोज घेतले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाणी वाया जाते तसेच गळत्यांमुळेही दररोज २० टक्के पाणी वाया जात आहे.

दोन वर्षांपासूनची गळती

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोरील रस्त्यालगत गेल्या दोन वर्षांपासून गळती कायम असून, मनपाकडून अनेकवेळा दुरुस्ती करून देखील ही गळती दुरुस्त होऊ शकलेली नाही.

वारंवार दुरुस्ती करूनही गळती कायम

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरातील गळती देखील एक-दीड वर्षांपासून कायम आहे. याठिकाणी दर महिन्याला मनपाकडून दुरुस्ती करण्यात येत असते. मात्र, दुरुस्ती केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा याठिकाणी पाणी गळती सुरू असते. याबाबत मनपाने कायमची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.