कोर्टात साक्ष दिली म्हणून तरुणीशी अश्लील वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST2021-01-25T04:17:16+5:302021-01-25T04:17:16+5:30

जळगाव : शैक्षणिक संस्था हस्तांतरणाच्या वादात न्यायालयात साक्ष दिल्याच्या कारणावरून सिग्नेट स्कूलचे संचालक मनीष रमेश कथुरिया (रा. मेहरून तलाव ...

Obscene behavior with the young woman as testified in court | कोर्टात साक्ष दिली म्हणून तरुणीशी अश्लील वर्तन

कोर्टात साक्ष दिली म्हणून तरुणीशी अश्लील वर्तन

जळगाव : शैक्षणिक संस्था हस्तांतरणाच्या वादात न्यायालयात साक्ष दिल्याच्या कारणावरून सिग्नेट स्कूलचे संचालक मनीष रमेश कथुरिया (रा. मेहरून तलाव परिसर) यांनी मेहरून तलाव परिसरात फिरायला आलेल्या एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणीला अडवून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून, एमबीएचे शिक्षण घेत असलेली तरुणी शनिवारी डी मार्ट परिसरात मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. तिला भेटून मेहरून तलाव परिसरात फिरायला गेली असता ५.४५ वाजता मनीष कथुरिया हा तेथे आला व ‘तू कोर्टात आमच्याविरुद्ध साक्ष दिलेली आहे, ती मागे घे’ असे म्हणाला, त्यास साक्ष मागे घेणार नाही, असे सांगितले असता कथुरिया याने अश्लीत शिवीगाळ करून अंगलट करून अश्लील वर्तन केले. या प्रकारामुळे आरडाओरड केल्याने बांधकामाच्या ठिकाणी असलेले मजूर तेथे आल्याचे पाहून कथुरिया तेथून निघून गेला. या प्रकारानंतर तरुणीने रात्री ११,३० वाजता एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. दरम्यान, ही तरुणी कथुरिया यांच्या शाळेत पूर्वी शिक्षिका होती. दोन दिवस आधीच या संस्थेच्या वादातून मनीष कथुरिया याच्या फिर्यादीवरून विकास परिहार व संजय परिहार (रा. भगीरथ कॉलनी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहायक फौजदार अतुल वंजारी या गुन्ह्यांचा तपास करीत आहेत.

Web Title: Obscene behavior with the young woman as testified in court